पिंपरी : अल्पवयीन मुलीला लग्नाचे आमिष दाखवून कासारवाडी व चिंचवड परिसरात लैंगिक अत्याचार केल्याची धक्कादायक घटना सोमवारी (ता.२७) पीडित मुलगी गरोदर राहिल्याने हा धक्कादायक प्रकार उघडकीस आला. याप्रकरणी सोलापूरच्या एका तरुणावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पृथ्वीराज जाधव (वय-२० रा. सोलापूर) असे गुन्हा दाखल झालेल्या तरुणाचे नाव आहे. याप्रकरणी पिडीत मुलीच्या आईने भोसरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. सदर प्रकार हा जानेवारी ते २७ फेब्रुवारी या कालावधीत घडला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पिडीत मुलगी ही १६ वर्षाची असून तिची आरोपी पृथ्वीराज जाधव याच्याबरोबर सोशल मीडियावर ओळख झाली होती. या ओळखीतून आरोपीने अल्पवयीन मुलीला लग्नाचे आमिष दाखविले.
त्यानंतर आरोपीने मुलीची विश्वास संपादन करुन तिला आकुर्डी रेल्वे स्टेशन येथे बोलावून घेतले व चिंचवड येथे नेऊन तिच्यासोबत बळजबरीने शारिरीक संबंध ठेवले. यातून पीडित मुलगी दीड महिन्याची गर्भवती राहिली. त्यामुळे सदर प्रकार उघडकीस आला आहे.
दरम्यान, याबाबत पीडित मुलीच्या आईने भोसरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार पृथ्वीराज जाधव याच्यावर 363, 376, पॉक्सो कायद्यांतर्गत गुन्हा दाखल केला आहे. पुढील तपास भोसरी पोलीस करीत आहेत.