सुरेश घाडगे
परंडा : परंडा येथे संत शिरोमणी सावता महाराज जयंती विविध सामाजिक उपक्रम राबवून मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली आहे.
संत शिरोमणी सावता महाराज जयंती तथा संजीवन समाधी ७२७ व्या सोहळ्यानिमित्त बुधवार ( ता. २७ ) शहरातील माळी गल्ली येथील संत शिरोमणी सावता महाराज मंदिर व काशीमबाग येथील मंदिर येथे संतांच्या मुर्तीचे पुजन , किर्तन, भजन , महाप्रसाद व विविध धार्मिक कार्यक्रम घेण्यात आले. माळी गल्ली येथे हभप प्रा.प्रभु महाराज माळी (भंडारा डोंगर देहू ) याांचे संत शिरोमणी सावता महाराज संजीवन समाधी सोहळ्याचे किर्तन झाले .
यावेळी नारायण मेहेर, नंदू शिंदे, उमाकांत गोरे, राजू अलबत्ते, धोंडीराम मोडकर, संतोष मेहर, अभिमान मोडे, बाळासाहेब मेहेर शिवाजी मेहेर शिवाजी एव्हरे सुभाष मेहेर मेहेत्रे, कानिफनाथ गोरे, लहू गोरे ,गणेश गोरे ,बजरंग गोरे ,उत्तम गोरे, ओंकार गोरे, रंगनाथ साडेकर, कपिल मोडे, अशोक अलबत्ते, शहाजी अलबत्ते, मंगेश गायकवाड, अजय मेहेर, संत शिरोमणी सावता महाराज प्रतिष्ठानचे पदाधिकारी उपस्थित होते .
दरम्यान, परंडा शहरातील काशीमबाग येथे हभप बालाजी महाराज बोराडे यांचे किर्तन झाले . यावेळी बापुराव भानवसे, संभाजी भानवसे, लक्ष्मण भानवसे, भिमराव भानवसे, परंडा तालुका मराठी पत्रकार संघाचे अध्यक्ष सुरेश घाडगे, बापु भानवसे, अशोक भानवसे, सोमनाथ भानवसे, धनंजय भानवसे, रमेश घाडगे, रामेश्वर भानवसे, हनुमंत भानवसे, अनिल भानवसे, रघुनाथ भानवसे, नामदेव भानवसे,नागनाथ भानवसे, महेश भानवसे, महेश एतवाडे, भैरवनाथ भानवसे,गोकुळ भानवसे,सागर भानवसे, रोहित भानवसे, आकाश घाडगे आदिसह भाविकभक्त मोठया संख्येने उपस्थित होते .