पुणे : बिअरमधून गुंगीचे औषध देऊन तरुणीवर बलात्कार करून फोटो व्हायरल करण्याची धमकी देऊन वारंवार शारीरीक संबंध ठेवून तरुणीला आपल्या मित्राबरोबर देखील शारीरीक संबंध ठेवण्यास भाग पडल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. याप्रकरणी आरोपीला चंदननगर पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत.
मयुर दत्तात्रय सातव (वय २१, रा. आव्हाळवाडी, वाघोली) असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. त्याचा मित्र शशिकांत कदम (रा. शुभम सोसायटी, सोमनाथनगर, वडगाव शेरी) याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी लोहगावमधील एका २० वर्षाच्या तरुणीने चंदननगर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली.
पोलिसांनी दिलेल्या माहिती नुसार, फिर्यादी व आरोपी शशिकांत कदम हे ओळखीचे आहेत. कदम याने फिर्यादी यांना बिअरमध्ये गुंगीचे औषध देऊन बलात्कार केला. त्याचे मोबाईलमध्ये फोटो काढले. हे फोटो फिर्यादीला दाखवून ते व्हायरल करण्याची धमकी देऊन फिर्यादीला वेगवेगळ्या ठिकाणी नेऊन तिच्यावर बलात्कार केला. फोटो व्हायरल करण्याची धमकी देऊन मित्र मयुर सातव याच्याशी संबंध ठेवण्यास भाग पाडले.
त्यानंतर सातव याने फिर्यादीला लग्नाचे आमिष दाखवून वेगवेगळ्या ठिकाणी नेऊन तिच्याशी शारीरीक संबंध ठेवले. तिला वारंवार फोन करुन तिचा पाठलाग करुन त्रास दिला. याप्रकरणी तरुणीने चंदननगर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली.
त्यानुसार मयुर सातव याला पोलिसांनी अटक केली आहे. तर त्याच्या मित्र आरोपी शशिकांत कदम याच्यावर गुन्हा दाखल केला असून या घटनेचा पुढील तपास पोलीस करीत आहेत.