युनूस तांबोळी
शिरूर : सायंकाळची वेळ होती. थंड वातावरणामुळे दवाखान्यातील पंखे बंद असले तरी पलंगा भोवती असणाऱ्या पडद्यात महिलांची कुजबूज अगदी स्पष्टपणे ऐकायला मिळत होती. काय झालं हो…सूरकतलेल्या चेहऱ्यावर असणारा चष्मा बाजूला सरकवत त्या आजीबाईन विचारल.
सिजर झाल…, नाय म्हटल काय झाल. आजी पुन्हा बोलली. हो… हो मुलगा झाला…हातातील बाळत बाळाभोवती झाकत सावरतच साठीतल्या मावशीन उत्तर दिल. बर झाल, बाई…मावशीन मोठ्या संकटातून सुटका व्हावी, असा सुस्कारा सोडतच बोलत होती.
पहिली पोरगी होती. आता मुलगा झाला, पोरीच्या जातीला सासर अन माहेर दोन्हीच मन संभाळावा लागत.एकदाचा मुलगा झाला हो… मावशी अगदी स्पष्टपणे बोलत होती.
ओतूर ( ता. जुन्नर ) येथील एका खाजगी दवाखान्यात चाललेला हा संवाद अगदी ह्दयाला स्पर्श करून जाणारा होता. आजही समाजात
मुलगा झाल की मुलगी ही विचारना अगोदर होते. पण प्रसुती वेदनाने मातेचा पुर्नजन्म होतो.
नैसर्गिक प्रसुती की शस्त्रक्रियेतून होणारी प्रसुती त्यातून त्या मातेला सहन कराव्या लागणाऱ्या वेदना याकडे फारसे लक्ष दिले जात नाही. याला समाजातील लिंगभेदचा पोरकटपणाच म्हणावा लागेल. तो आजही समाजात दिसून येत आहे. मुलगा म्हणजे समाधान आणि मुलगी म्हणजे तडजोड असेच काहीसे वातावरण त्या वार्डात पहावयास मिळाले.
पुणे जिल्ह्यात आजही लिंगभेद होत असल्याचे दिसून येत आहे. स्त्री जातीच्या अर्भकाला रस्त्यावर अथवा बेवारस ठिकाणी सोडून दिले जात आहे. पोटच्या गोळ्याला नऊ महिने नऊ दिवस उरात संभाळ करायचा. त्यातून कुटूंबाच्या व समाजाच्या रोषाला सामाोरे जायचे.
कोवळ्या जीवाला काही कळण्याच्या आतच पुन्हा बेवारस ठिकाणी सोडून द्यायचे. हा विषयच मुळी समाजातील लिंग भेदातील पोरकटपणा आहे. याकडे मानव नैसर्गिक संपत्ती म्हणून केव्हा पाहिल. हे आता संशोधनाचा विषय ठरू पहात आहे.
जून्नर, आंबेगाव या परिसरात स्त्री लिंग असणारे अर्भक बेवारस ठिकाणी सोडून दिल्याच्या घटना ऐकायला मिळाल्या. त्यावेळी मात्र या परिसरात जनजागृती होणे महत्वाचे आहे.
भविष्यात लॅबबेवीपासून मोठ्या प्रमाणात मानवाची उत्पत्ती होणार असे बाबा वेगांने भविष्यवाणी केली आहे. या मानव उत्पत्तीत रंग, लिंग, आकार आणि रूप देखील हवे तसे मानवाला मिळणार या बाबतचे वृत्त प्रसिद्ध होऊ लागले आहे.
स्त्री पुरूषाचा असणारा मोहक आकर्षणपणा व त्यांच्यातील मनोमिलणपणा नाहिसा होणार असल्याचे सांगितले जाते. त्यामुळे मानव निसर्गावर मात करत असताना कोणते संकट निर्माण करू पहात आहे. यामुळे मानव जीवन संकटात येणार असल्याचे भाकीत या भविष्यवेत्याने केले आहे.
पण समाजात आजही लिंगभेदातून सामाजिक दुरी निर्माण करण्याचे काम होत असल्याचे दिसून येत आहे. नैसर्गिक आपत्ती, लिंगभेदामुळे महिला व पुरूषांच्या आकडेवारी सामाजिक दरी निर्माण होत चालली आहे. त्यातून विनयभंग, बलात्कार यासारख्या गुन्हेगारी प्रवृत्ती निर्माण होऊ लागल्या आहेत. त्याला ही समाजच कारणीभूत आहे. समाजाचे मुलीविषयी असणारे विचार बदलले पाहिजे.
यासाठी समाजातील संस्थांनी पूढाकार घेतला पाहिजे. वंशाला दिवा यासाठी होणारा समाजातील अट्टहास संपला पाहिजे. वेगवेगळ्या क्षेत्रात काम करणाऱ्या महिला तसेच वेगवेगळ्या ठिकाणी नैपुण्य मिळविणाऱ्या महिला यांचा आदर्श समाजाने डोळ्यासमोर ठेवला पाहिजे.
शासन पातळीवर यासाठी अनेक योजना मुली व महिलांसाठी आल्या आहेत. त्याचा प्रचार आणि प्रसार कमी होत असल्याचे दिसून येत आहे. यासाठी गावपातळीवर वाडीवस्ती ठिकाणी लिंग भेदाची जागृती महिलांकडूनच महिलांमध्ये झाली पाहिजे.
प्रसुती पुर्वी तपासणी केल्यावर डॅाक्टर देखील शस्त्रक्रिया करून प्रसुती करण्याचा सल्ला देतात. पण खरेच त्या शस्त्रक्रियेची महिलेला गरज आहे का ? याचा खुलासा कोणीच करत नाही. डॅाक्टरच आपला देव मानून किंवा खरच नैसर्गिक प्रसुतीत अडचण आहे. असे समजून सिजर करून शस्त्रक्रियेतून प्रसुती होत आहे.
या बाबात डॅाक्टरांचा कल पहावयास मिळत आहे. नैसर्गिक प्रसुती करण्यासाठी त्या महिलेला नैसर्गिक प्रसुती करण्यासाठी मानसिक आधार दिला जातो का? तिच्यात तसा आत्मविश्वास तयार केला जातो का ? प्रसुती पुर्व आहार व व्यायामाच्या सवयी यासाठी शिबीरे आयोजीत केल्या जातात काय ? त्यात महिला भाग घेतात का?
नैसर्गिक प्रसुतीसाठी च्या सुविधा उपलब्ध करून दिल्या आहेत काय ? लिंग भेद करत असताना स्त्री नेच स्त्री चा सन्मान केला पाहिजे. यासाठी कुटूंबात, आरोग्य खात्यात महिला महिलांसाठी काम करतात का ? हे लक्षात घेतले पाहिजे. या काही गोष्टी महिलांनी चर्चेतून सोडवित असताना महिलांची काळजी महिलांनीच घेतली पाहिजे.
‘ईश्वरी निर्मितीत स्पर्श सेवेचा’…असा काहिसा वैद्यकिय क्षेत्रातील सहकाराचा भाग डॅाक्टरांचा असला पाहिजे. त्या बरोबर नैसर्गिक की शस्त्रक्रिया मधून प्रसुती करावयाची यासाठी महिलांना योग्य सल्ला दिला गेला पाहिजे. पुरूष की स्त्री लिंग भेदा बाबत सामाजिक दरी निर्माण होणार नाही. यासाठी आरोग्य विभागाकडून काम होणे गरजेचे आहे. प्रत्येक कुटूंबाला मार्गदर्शन करणे आवश्यक आहे.
– वैशाली चव्हाण
अध्यक्ष तेजस्विनी फाऊंडेशन शिरूर
समाजात त्याही पेक्षा कुटूंबात आजही लिंगभेदाकडे अधिक लक्ष दिले जाते. वंशाला दिवा असावा म्हणून घरातील कर्त्या महिलांचा अट्टहास असतो. महिलादेखील अनेक क्षेत्रात नावलौकीक मिळवत आहेत. त्यामुळे कुटूंबानेच हा पोरकटपणा सोडला पाहिजे. प्रसुती पुर्वी आहार व व्यायामाला महत्व दिले गेले पाहिजे. त्यातून नैसर्गिक प्रसुती होण्यास मदत होईल. वेगवेगळे आजार सध्या तोंडवर करू पहात आहे. यामुळे महिलांचे आरोग्य सुव्यस्थीत ठेवण्यासाठी त्यांना मानसिक आधार दिला गेला पाहिजे. महिलांनीच महिलांना सन्मान दिला तर समाजातील स्त्री पुरूष ही सामाजिक दरी वाढणार नाही.
डॉ. ज्योती विश्वास मुळे
स्त्री रोग तज्ञ शिरूर
स्त्रीयांना कुटूंबात आजही सन्मान मिळत नाही. शिक्षणाने समाजात जागृती निर्माण होत असली तरी कूटंबातील मानसिकता बदलत नाही. शाळा शाळांमधून मुलींना स्त्री चे महत्व व त्यांचा सन्मान या बाबत मार्गदर्शन होणे गरजेचे आहे. त्यांचे हक्क, कर्तव्य व जबाबदारी याचे महत्व पटवून दिले पाहिजे. त्यामुळे मुली माता होताना विशेष काळजी घेतील व स्त्री- पुरूषातील सामाजीक दरी नाहिसी होण्यास मदत होईल.
– स्वाती दौंडकर
शिक्षिका शिक्रापूर
लिंगभेदामुळेच अनेक कुटूंबात कटूता निर्माण होत असते. मुली देखील मोठ्या प्रमाणात वेगवेगळ्या क्षेत्रात कर्तत्ववान बनल्या आहे. त्यामुळे अट्टहास न करता स्त्री अर्भकाचा मान सर्वांनी ठेवला पाहिजे. गावागावात सामाजीक संस्थानी यासाठी पुढाकार घेऊन सामाजिक दरी दूर करावी. महिलांनी देखील प्रसुतीमध्ये आरोग्याकडे लक्ष द्यावे. सरकारी प्राथमिक आरोग्य केंद्रात मिळणाऱ्या मोफत सुविधांचा अवलंब करावा.
– वैशाली रत्नपारखी,
अध्यक्ष राजमाता महिला ग्रुप कवठे येमाई