पुणे : पुढच्या महिन्यात म्हणजेच येणाऱ्या मार्च महिन्यात बँका सुट्ट्यांनी भरल्या आहेत. कारण मार्चमध्ये अनेक सण उत्सव आहेत. जर आपणास पुढच्या महिन्यात बँकेच्या काही महत्त्वाची कामे करायची असतील तर ती याच महिन्यात करा.
कारण पुढच्या महिन्यात साप्ताहिक सुट्ट्यांसह एकूण १२ दिवस बँक बंद राहणार आहे. रिझर्व बँक ऑफ इंडियाने बँकांच्या सुट्ट्यांची यादी जाहीर केली आहे.
तसेच मार्च महिन्यात होळी हा सण आहे. होळी हा हिंदू धर्मातील एक महत्त्वाचा सण आहे. हा सण मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. होळी व्यतिरिक्त चैत्र नवरात्र, तेलगू न्यू इयर, गुडी पाडवा, रामनवमी सारखे अनेक सण या महिन्यात साजरे केले जातात. ज्या त्या राज्याप्रमाणेच रिझर्व बँकेने त्यांच्या सुट्ट्यांची यादी जाहीर केली आहे.
बँका या दिवशी राहतील बंद…
०३ मार्च – चापचर कूटच्या निमित्ताने सुट्टी
०५ मार्च – रविवार (साप्ताहिक सुट्टी)
०७ मार्च – होळी सुट्टी
०८ मार्च – लेटी, डोल जात्रा, होळी सुट्टी
०९ मार्च – होळी पाटणा सुट्टी
११ मार्च – दुसरा शनिवारची सुट्टी
१२ मार्च – रविवार (साप्ताहिक सुट्टी)
१९ मार्च – रविवार (साप्ताहिक सुट्टी)
२२ मार्च – गुडी पडवा/ उगडी/ बिहार दिन/ प्रथम नवरात्र/ तेलगू नवीन वर्ष
२५ मार्च चौथा शनिवार सुट्टी
२६ मार्च – रविवार (साप्ताहिक सुट्टी)
३० मार्च – राम नवमी