राजेंद्रकुमार शेळके
पिरंगुट : शिवरायांचे गुण सर्व मुलांनी आचरणात आणून स्त्रियांचा आदर करावा तसेच समाजासाठी काहीतरी करावे. ज्या प्रकारे शिवरायांनी आपल्या आईचे स्वप्न पूर्ण केले तसेच आजच्या या दिवशी मुलांनीही संकल्प करून आपल्या आई वडिलांचे स्वप्न पूर्ण करतील असे मत संस्कार इंग्लिश मीडियम स्कूलच्या अध्यक्षा व मुख्याध्यापक स्नेहा साठे यांनी केले.
पिरंगुट (ता. मुळशी) येथील संस्कार इंग्लिश मीडियम स्कूल आणि जुनियर कॉलेज येथे रविवारी (ता. १९) शिवजयंती आणि मातृ पितृ पूजन दिनाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी मुख्याध्यापक स्नेहा साठे बोलत होत्या. कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी ह. भ. प. सोमनाथ महाराज साठे हे होते.
कार्यक्रमाची सुरुवात दीप प्रज्वलन तसेच मान्यवरांचा परिचय सत्कार प्रास्ताविक यांनी करण्यात आली. आपल्या संस्कार फॅमिली चे विद्यार्थी यांनी आपले विविध कला गुण सादर केले. त्यामध्ये इयत्ता पहिलीची श्रेया गोरे हिने शिवगर्जना तसेच नर्सरी चा विद्यार्थी पोवाडा, त्याचप्रमाणे स्वराज शेडगे या तिसरीतल्या विद्यार्थ्याने शिवरायांचे ध्येयमंत्र, प्रेरणा मंत्र, शिवसुर्य हृदय सादर केले.
इयत्ता चौथीचा विद्यार्थी प्रथमेश बबले याने पोवाडा सादर केला. सातवीच्या विद्यार्थ्यांनी नृत्य सादर केले. शिक्षिका सुप्रिया जाधव यांनी भाषणातून आपले मनोगत सादर केले.
गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु या प्रार्थनेतून प्रेरित होऊन मातृ पितृ पूजनाचा विलोभनीय असा कार्यक्रम झाला. अतिशय सुंदर आणि मनाला भावणारा असा हा आजचा क्षण होता. कार्यक्रमाचे आयोजन मुख्याध्यापक स्नेहा साठे यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आले सर्व शिक्षक व विद्यार्थी यामध्ये सहभागी झाले पालकांचाही मोठ्या प्रमाणात सहभाग होता.
दरम्यान, कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी ह. भ. प. सोमनाथ महाराज साठे हे होते आजच्या अतिथींनी गेले वीस वर्ष वारकरी संप्रदायात काम करत असताना प्रबोधन, भजन यामध्ये स्वतःला झोकून देऊन समाज प्रबोधन केले.
यांना विविध पुरस्काराने मुळशी भूषण, मुळशी रत्न, गायन कोकिळा, शिवभूषण, संत साहित्य अशा विविध पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आले आहे. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन योगिता खैरनार यांनी केले.