शिरुर : रांजणगाव परिसरात महिलेवर बला-त्कार करणाऱ्या आरोपीला रांजणगाव एमआयडीसी पोलिसांनी नुकतीच अटक केली आहे.
रमेश बापुराव काळे (वय-४६, रा. निमोणे, ता. शिरुर, जि. पुणे) असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. याप्रकरणी एका पिडीत महिलेनी रांजणगाव एमआयडीसी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
रांजणगाव एमआयडीसी पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी रमेश काळे याने पिडीत महिलेच्या घरी जाऊन बळजबरीने शारीरिक संबंध प्रस्थापित केले. तसेच हा प्रकार जर कोणाला सांगितला तर जीवे मारण्याची धमकी देत जातीवाचक शिवीगाळ केली.
त्यानंतर पीडितेने रांजणगाव एमआयडीसी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली. त्यानुसार आरोपीच्या विरोधात अनुसूचित जाती जमाती कायद्या अंतर्गत अट्रॅसिटी तसेच बलात्काराचा गुन्हा दाखल करण्यात आला.
गुन्हा दाखल होताच पोलिसांनी आरोपीला तातडीने अटक केली आहे. पुढील तपास शिरुरचे उपविभागीय अधिकारी यशवंत गवारी करत आहेत.