पुणे : निवडणूक आयोगाने उद्धव ठाकरे यांच्याकडून धनुष्यबाण हे चिन्ह काढून घेतल्याचा फारसा परिणाम होणार नाही, नवीन चिन्ह घेऊन त्यांना लोकांसमोर जावे लागेल आणि लोकही त्यांचे नवीन चिन्ह मान्य करतील, अशी प्रतिक्रिया ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी व्यक्त केली.
बारामतीत आज माध्यमांशी बोलताना त्यांनी ही प्रतिक्रिया दिली आहे.
शरद पवार पुढे म्हणाले की, यापूर्वी काँग्रेसला देखील गाय वासरू हे चिन्ह गमवावे लागले होते. हे चिन्ह गेल्यानंतर त्यांनी हाताचा पंजा हे चिन्ह स्वीकारले आणि नंतरच्या काळात लोकांनी ते चिन्ह मान्य केले.
या निर्णयाचा उद्धव ठाकरे यांच्यावर फारसा परिणाम होईल असे वाटत नाही, असे मत व्यक्त करून शरद पवार म्हणाले की, या निर्णयाची काही दिवस चर्चा होईल आणि नंतर लोक विसरून जातील आणि नवीन चिन्ह मान्य करतील. असे त्यांनी सांगितले आहे.