वडूज : खटाव तालुका पत्रकार संघाच्या अध्यक्षपदी खटावचे अविनाश कदम, उपाध्यक्षपदी औंधचे सचिन सुकटे, तर मायणीचे इम्रान जमादार व वडुजचे नितीन राऊत यांची सहकार्यकारिणीची सर्वानुमते निवड करण्यात आली.
आज जाहीर करण्यात आलेल्या कार्यकारणीमध्ये सहसचिवपदी पुसेगावचे विशाल सुर्यवंशी, कोषाध्यक्षपदी कातर खटावचे विठ्ठल नलवडे, कलेढोणचे दिपक नामदे, जिल्हा प्रतिनिधी म्हणून खटावचे जेष्ठ पत्रकार विनायक भिसे, सायगावचे अजित जगताप तर प्रसिद्धी प्रमुखपदी विसापूरचे ऋषिकेश पवार यांची निवड करण्यात आली.
येथील समर्थ करियर ॲकॅडमी येथे झालेल्या बैठकीत जेष्ठ पत्रकार प्रा दिलीप पुस्तके, पांडुरंग तारळेकर ,फिरोज मुलाणी (सर), विलासराव आपटे, पद्मनील कणसे आदी उपस्थित होते. यावेळी नाजीम मुल्ला, संतोष साळुंखे, प्रशांत जाधव, पंकज कदम, विलास कुलकर्णी, नितीन राजे, केशव कचरे यांनी मराठी पत्रकार परिषदेचे सदस्यत्व स्विकारले.
यावेळी प्रा. दिलीप पुस्तके, विनय भिसे, पांडुरंग तारळेकर, अजित जगताप, विलासराव आपटे, सचिन सुकटे यांनी उपस्थित पत्रकारांना मार्गदर्शन केले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक फिरोज मुलांनी यांनी तर आभार प्रदर्शन दत्ता कोळी यांनी केले.