राहुलकुमार अवचट
यवत : महानगर टाईम्सचे राजापूर येथील पत्रकार शशिकांत वारीशे यांचा अपघात नसून घातपात केला आहे. याची उच्चस्तरीय चौकशी झाली पाहिजे. या मागणीसाठी दौंड तालुका पत्रकारांच्या वतीने निषेध व्यक्त करण्यात आला.
सोमवारी कोदवली येवून आपल्या दुचाकीने जात असताना भरधाव वेगाने येणाऱ्या महेंद्रा गाडीने त्यांच्या गाडीला धडक दिली. या अपघातात त्यांचा जागेवरच मृत्यू झाला. या घटनेच्या निषेधार्थ
सभ्य आणि सुसंस्कृत भूमिका घेऊन महाराष्ट्रात पत्रकारिता करणाऱ्या पत्रकारांचा आवाज कायमचा बंद केला जातो.
पत्रकारांवर हल्ले करून किंवा त्यांच्यावर खोटे गुन्हे दाखल करून दहशत निर्माण करण्याचा प्रयत्न होताना दिसतोय, पत्रकार संरक्षण कायदा आहे मात्र या कलमाखाली गुन्हे दाखल करायला टाळाटाळ केली जाते त्यामुळे महाराष्ट्रात निर्भीडपणे काम करणे पत्रकारांना कठीण झाले आहे. या घटना सातत्यानं वाढत असल्याने पत्रकारांमध्ये भिंतीची भावना निर्माण होत आहे.
याप्रकरणी यवत पोलीस स्टेशन, तहसीलदार दौंड, व उपविभागीय पोलीस अधिकारी दौंड यांना निवेदन देण्यात आली असून आरोपीवर पत्रकार संरक्षण कायद्यानुसार गुन्हा दाखल करावा, या घटल्याची सुनावणी जलदगती न्यायालया मार्फत व्हावी व राज्यात पत्रकार संरक्षण कायद्याची कठोर अंमलबजावणी व्हावी अशी मागणी करण्यात आली आहे.
दरम्यान, हत्या झालेले पत्रकार शशिकांत वारिशे यांच्या कुटुंबियांना न्याय मिळावा व राज्यात पत्रकारांना मुक्तपणे काम करण्यासारखे वातावरण तयार करण्याची सरकारची जबाबदारी असून त्यादृष्टीने प्रयत्न व्हावेत अशी मागणी यावेळी करण्यात आली
. यावेळी दौंड तालुका पत्रकार संघ व दौंड तालुका सोशल मीडिया पत्रकार संघाचे पदाधिकारी व सदस्य मोठ्या संख्येने उपस्थित होते.