Thursday, July 2, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

इंदापूर पोलिसांनी ६० लाख रुपये किमतीचा गांजा पकडला : दोन जण पोलिसांच्या ताब्यात ; इंदापूर पोलिसांची शानदार कामगिरी

विशाल कदमby विशाल कदम
Saturday, 11 February 2023, 11:45

दीपक खिलारे
इंदापूर : विशाखापट्टणम येथून पुण्याकडे जाणाऱ्या हुंदाई क्रेटा कार मधून ६० लाख रुपये किंमतीचा २४० किलो गांजा पुणे- सोलापूर राष्ट्रीय महामार्गावरील सरडेवाडी टोल नाक्याजवळ ९ फेब्रुवारी रोजी रात्री साडेनऊ वाजण्याच्या सुमारास इंदापूर पोलिसांनी सापळा लावून पकडला. ७० लाखांच्या मुद्देमालासह दोन आरोपींना पोलिसांनी अटक केली.

रुपेश दिलिप जाधव ( रा. वृंदावन पार्क कसबा, बारामती जि. पुणे) सुनील तुळशीदास वेदपाठक ( रा. वाघजरोड, देवळे पार्क, बारामती जि. पुणे) अशी आरोपींची नावे आहेत.

पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार, हुंदाई क्रेटा या कार मधून गांजा घेऊन जात असल्याची खबर इंदापूर पोलिसांना मिळाली होती. त्यानुसार इंदापुर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक दिलीप पवार यांच्या पथकाने गुरुवारी (दि.९) रात्री ८ वाजताच्या दरम्यान सरडेवाडी टोलनाका येथे सापळा लावला.

 

यावेळी सोलापूरकडून पुण्याच्या दिशेने एक हुंदाई कंपनीची क्रेटा मोटार (एम .एच. ४२ ए.५६५६ ) ही पोलीसांना संशयास्पद वाटली. पोलीसांनी त्या कारला थांबविण्याचा प्रयत्न केला असता कारमधील लोकांनी कारसह पळून जाण्याचा प्रयत्न केला. मात्र, त्यात ते अपयशी ठरले.

पोलिसांनी कारची डिक्की उघडून पाहिली असता डिक्की आणि मधल्या सिटच्या खाली खाकी रंगाचे चिकटपट्टीचे आवरण असलेले १२० पॅकेट्स मिळून आले. यामध्ये पोलीसांना कॅनाबियस वनस्पतीची पाने, फुले, बिया, बोंडे यांचा समावेश असलेला हिरवट तपकिरी रंगाचा असा ६० लाख रुपये किमतीचा एकुण २४० किलो ओलसर गांजा मिळून आला. मुद्देमालसह १० लाख रुपये किमतीची कार ताब्यात घेण्यात आली.

पोलीस अधिक्षक पुणे ग्रामीण अंकित गोयल, अप्पर पोलीस अधिक्षक आनंद भोईटे, उप विभागिय पोलीस अधिकारी गणेश इंगळे यांचे मार्गदर्शनाखाली इंदापूर ठाण्याचे पोलीस निरीक्षक दिलीप पवार,सहाय्यक निरीक्षक प्रकाश पवार, पोलीस नाईक सलमान खान, हवालदार बालगुडे, जवान लक्ष्मण सुर्यवंशी, दिनेश चोरमले, शिधाराम गुरव, विनोद काळे, गजानन वानोळे व विकास राखुंडे, विक्रम जमादार यांच्या पथकाने ही कामगिरी केली.

पुढील तपास सहाय्यक निरीक्षक प्रकाश पवार करत आहेत.

विशाल कदम

विशाल कदम

पत्रकारिता क्षेत्रात गत ५ वर्षांपासून कार्यरत. संशोधनात्मक लेखनात विशेष प्राविण्य. राजकारण, उद्योग जगत, आर्थिक घडामोडी, स्टार्टअप, आंतरराष्ट्रीय घडामोडींचे विश्‍लेषण तज्ञ. दैनिक पुण्यनगरी , दैनिक राष्ट्रसह्याद्री मधील कामासह गेल्या दीड वर्षांपासून पुणे प्राईम न्यूज मध्ये बातमीदार म्हणून कार्यरत आहे.

ताज्या बातम्या

शनिवारवाड्याचा ‘हजारी कारंजा’ पुन्हा होणार सुरू! पेशवेकालीन जलव्यवस्थापन पूर्ववत करण्याचा केंद्राचा निर्णय

Thursday, 2 July 2026, 22:38

पुणेकरांची मोठी प्रतीक्षा संपली! मेट्रो आता थेट लोहगाव विमानतळापर्यंत; कल्याणीनगर ते विमानतळ मार्गाला मंजुरी

Thursday, 2 July 2026, 21:59

पुण्यातील घटना! ‘खडकी मे चांदणे गँग राज करेगी’ मैत्रिणीवरून वाद; डायरेक्ट डोक्यात कोयता घातला अन्…

Thursday, 2 July 2026, 21:07

पुणे पोलिसांचा ‘सिंघम’ अवतार! गुंडाच्या हॉटेलवर चालवला बुलडोझर; आर्थिक रसद तोडल्याने गुन्हेगारी टोळ्यांचे धाबे दणाणले

Thursday, 2 July 2026, 20:30

‘महाराष्ट्र एपस्टीन फाइल्स’ चित्रपटावर रुपाली चाकणकरांची प्रतिक्रिया; म्हणाल्या “पात्र साकारण्यासाठी माझी परवानगी…”

Thursday, 2 July 2026, 19:47

पुण्यात केअरटेकरचा कारनामा! वृद्ध आईची जबाबदारी सोपवली; विश्वास ठेवला अन् तिनंच घात केला

Thursday, 2 July 2026, 18:54
Next Post

पत्रकार शशिकांत वारीशे हत्याप्रकरणातील गुन्हेगारांवर कडक कारवाई करावी - दौंड तालुका पत्रकारांच्या वतीने निषेध..!

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.