पुणे : वडिलाने भविष्याकरीता म्युच्युअल फंडमध्ये गुंतवणुक केलेली असताना त्यांच्या मृत्युनंतर सावत्र मुलाने वडिलांच्या नावाने बनावट ई-मेल तयार करुन म्युच्युअल फंडाची ११ कोटी ४० लाख २८ हजार ३६४ रुपयांची फसवणूक केल्याचा प्रकार समोर आला आहे
मुकुंद अशोक कैरे (वय. ५१, रा. टॉपवर अपार्टमेंट, नोएडा, उत्तर प्रदेश) असे गुन्हा दाखल करण्यात आलेल्या तरुणाचे नाव आहे. याप्रकरणी औंध येथील नॅशनल सोसायटीत राहणार्या एका ७० वर्षाच्या महिलेने चतु:श्रृंगी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहिती नुसार, फिर्यादी यांच्या पतीने भविष्याकरीता म्युच्युअल फंड खात्यात ११ कोटी ४० लाख रुपयांची गुंतवणूक केली होती. मृत्युच्या वेळी ती त्यांच्या ताब्यात होती. त्यांच्या मृत्युनंतर त्यांच्या ऑगस्ट २०२० मध्ये आरोपी मुकुंद कैरे याने वडिलांच्या नावाने बनावट ई मेल आय डी तयार केला. त्याद्वारे त्यांनी वेगवेगळ्या म्युच्युअल फंड अकाऊंटचा अशोक कैरे यांचा रजिस्टर्ड मोबाईल नंबर बदलून त्याजागी स्वत:चा मोबाईल नंबर टाकला. तो अशोक कैरे यांचा असल्याचे भासवून रजिर्स्टड केला.
त्यानंतर त्यांने या बनावट ई मेल व बदलेला मोबाईल क्रमांकाचा गैरवापर करुन या म्युच्युअल फंड खात्याील सर्व रक्कम स्वत:च्या बँक खात्यात जमा करुन घेतली. या फसवणूकीची माहिती मिळाल्यानंतर फिर्यादी यांनी न्यायालयात धाव घेऊन तक्रार दिली. त्यानंतर आता न्यायालयाच्या आदेशानुसार चतु:श्रृंगी पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. या घटनेचा तपास पोलीस करत आहेत.