लोणी काळभोर (पुणे) : थेऊर (ता. हवेली) येथील ग्रामदैवत महातारीआई देवी यात्रेनिमित्त आयोजित कुस्त्यांच्या आखाड्यात पुन्हा एकदा मल्लांच्या शड्डुचा आवाज घुमला. यात्रेनिमित्त कुस्त्यांचा जंगी आखाडा भरविण्यात आला होता. यावर्षी सुद्धा अनेक पैलवान आखाड्यात उतरले होते. यामध्ये २६ मल्लांच्या निकाली कुस्त्या झाल्या.
उपमहाराष्ट्र केसरी महेंद्र गायकवाड व रोहतकचा (दिल्ली) चा पै. सोनूकुमार यांच्यात झालेल्या निकाली कुस्तीत अवघ्या दहा मिनिटात महेंद्र गायकवाड याने सोनूकुमारला चितपट केले. यावेळी आखाड्यात एकच जल्लोष झाला. दुसर्या क्रमांकाची कुस्ती बाला रफिक व माऊली जमदाडे यांच्यात अतिशय अटीतटीची झाली. बराचवेळ दोघांनीही डावप्रतिडाव केले शेवटी माऊली जमदाडेनी बलाढ्य पैलवान बाला रफिक याला पराभूत केले. विजेत्या पहीलवांना १ लाख १ हजार १ रुपयांची बक्षिसे देण्यात आली. या कुस्ती आखाड्यात पंच म्हणून यशवंतचे माजी संचालक पांडुरंग काळे, हवेलीचे माजी पंचायत समिती सदस्य हिरामण काकडे यांनी काम पाहिले.
या उत्सवात विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. येथे निकाली कुस्त्यांचा आखाडा भरत असल्याने अनेक कुस्ती शौकीन व मल्ल या स्पर्धेसाठी येत असतात. यावर्षी सुद्धा अनेक पहिलवान आखाड्यात उतरले होते. पुणे, सातारा व मुंबई येथील नामवंत मल्लांनी या आखाड्यात सहभाग घेतला होता.
दरम्यान, श्री महातारीआई देवीची यात्रा दरवर्षी माघ पौर्णिमेस असते. याही वर्षी ही यात्रा अतिशय उत्साहात पार पडली. पौर्णिमेच्या दिवशी रात्री दहा वाजता देवीची पालखी मिरवणूक सोहळा (छबिना) पार पडला. वाजतगाजत म्हतारीआई माता मंदीर ते गाव ग्रामप्रदक्षिणा पूर्ण केली. दुसऱ्या दिवशी सकाळी दहा वाजता सुरेखा पुणेकर यांचा ‘नटरंगी नार’ सदाबहार कार्यक्रम पार पडला. त्यानंतर निकाली कुस्त्यांच्या जंगी आखाडा सुरु झाला.
मुंबई महापौर केसरी आबा काळे, आरपीआयचे अध्यक्ष मारुती कांबळे, बहुजन दलित महासंघाचे आनंद वैराट, अष्टविनायक पतसंस्थेचे संचालक शरद काकडे, ग्रामपंचायत सदस्य विठ्ठल काळे, युवराज काकडे, राहूल कांबळे, माजी उपसरपंच विलास कुंजीर, नितिन कुंजीर, गोविद तारु, सुखराज कुंजीर, तानाजी कुंजीर, गणेश रसाळ, बाळासाहेब शेडगे, सुरेश कांबळे, सुरेश चव्हाण, दत्ता तांबे, विजय कुंजीर, विजय कुंजीर, वैभव बडदे, निखिल कुंजीर, प्रकाश आळंदे ग्रामपंचायत कर्मचारी तसेच अनेक नामंकित्त मान्यवर पैलवान वस्ताद उपस्थित होते.
लोणी काळभोर पोलिस स्टेशनचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक दतात्रय चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस उपनिरीक्षक विष्णू देशमुख, अमित घोडके, पोलिस हवालदार विजय जाधव, दिगंबर जगताप, विशाल बनकर, रामदास मेमाणे यांनी चोख बंदोबस्त ठेवला होता. कुस्तीचे समालोचन निवेदक युवराज केचे यांनी केले. आलेल्या सर्व पैलवान तसेच कुस्ती प्रेमी पेक्षकांचे स्वागत व आभार थेऊर सार्वजनिक उत्सव कमिटीच्या वतीने करण्यात आले.