पुणे – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या मंत्रिमंडळात मनसे प्रमुख राज ठाकरे यांचे चिरंजीव आणि मनसेचे युवा नेते अमित ठाकरे यांना मंत्रिपद मिळणार, अशी चर्चा काही दिवासापासून माध्यमांमध्ये आहे.
भाजप नेते आणि राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी देखील अमित ठाकरे यांना मंत्रिपदाची ऑफर दिली होती, असं बोललं जात होतं. राज ठाकरे यांनी या चर्चेला पूर्णविराम दिला आहे. अमित ठाकरे हे नव्या सरकारमध्ये मंत्री होणार नाहीत, अशा मोठा खुलासा राज ठाकरे यांनी केला आहे.
अब राजा का बेटा राजा नही बनेगा राजा वही बनेगा जो हकदार होगा pic.twitter.com/2QxhYD8OeR
— Sandeep Deshpande (@SandeepDadarMNS) July 25, 2022
या सर्व पार्श्वभूमीवर मनसेचे सरचिटणीस संदीप देशपांडे यांनी सूचक टि्वट केले आहे. शिवसेनेला डिवचण्याची एकही संधी संदीप देशपांडे सोडत नाही, आजही त्यांनी टि्वट करुन शिवसेनेची खिल्ली उडवली आहे. “अब राजा वही बनेगा जो हकदार होगा,” असे टि्वट देशपांडे यांनी केले आहे. शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरेंसोबतचा राज ठाकरेंचा फोटो देशपांडेंनी शेअर केला आहे. आला आहे.
मनसेच्या मंत्रिमंडळ विस्तारामध्ये समावेश असणार या चर्चेमुळे उत्साहाचे वातावरण आहे. अशा चर्चा सुरू असल्यातरी अमित ठाकरेंनी ऑफ द रेकॉर्ड गृहमंत्री पदाची मागणी केली होती. यामुळे भाजप आणि मनसेच्या युतीच्या चर्चा दबक्या आवाजात सुरू आहेत. अब राजा का बेटा राजा नही बनेगा राजा वही बनेगा जो हकदार होगा त्याचा मतितार्थ आहे. बाळासाहेबांचे विचार आता राज ठाकरे पुढे घेऊन जाणार आहेत, बाकी कुणीही नाही, असा दावाच देशपांडेंनी केला आहे