विशाल कदम
लोणी काळभोर : ज्या वयात धड बोलताही येत नाही. त्या वयात लोणी काळभोर (ता. हवेली) येथील एका चिमुकलीने विश्वविक्रम करून दाखवला आहे. आणि तिची वर्ल्ड वाइल्ड बुक ऑफ रेकॉर्डमध्ये निवड झाली आहे. ही खरच एक अभिमानाची गोष्ट आहे.
ऋता अनुप ढम (वय-२) असे या चिमुकलीचे नाव आहे. तर लोणी काळभोर येथील एका कार्यक्रमात विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी ऋताचे अभिनंदन केले. तसेच दादांनी ऋताच्या पाठीवरती कौतुकाची थापसुद्धा टाकली आहे.
ऋता ही स्वतःचे संपूर्ण नाव, फळे, भाजीपाला ,प्राणी ,पक्षी, मराठी मुळाक्षरे ,ए टू झेड, वन टू ट्वेंटी नंबर्स ,असंख्य कविता, शुभंकरोती ,लक्ष्मी स्तोत्र असे एक ना अनेक गोष्टी ती म्हणून दाखवते. प्रत्येक गाण्यावर डान्स करणे ,गाणं म्हणणे, अनेक गाणे तिच्या तोंड पाठ आहे. जसे की ,’एकटी एकटी घाबरलीस ना!’ अशी गाणी होय. त्याचबरोबर ती एखाद्याचे हुबेहूब नक्कल करणे अशा अनेक लीला करून दाखवते. याच सर्व गोष्टींसाठी ऋताची वर्ल्ड वाइल्ड बुक ऑफ रेकॉर्डमध्ये निवड झाली आहे.
ऋताचा डान्स करणे हा तिचा आवडता छंद आहे. एखादे गाणे लागले की ती डान्स करते, तसेच तिच्या आजीबरोबर योगाही करते, तिच्या बाबांबरोबर गाण्याचा रियाज करते. तिचे दोन भाऊ शिवम व सोहम यांच्याबरोबर फोनवर व्हिडिओ कॉलवर बोलायला तिला आवडते. अर्थात तिला हे सर्व काही येत नसेलही पण तिच्या प्रयत्नांना तिच्या बुद्धीला आणि तिच्या चातुर्याला नक्कीच दाद आपल्याला द्यावी लागेल.
दरम्यान, ऋताचे वडील लोणी काळभोर येथील एम आय टी कॉलेज येथे मीडिया अँड ब्रॉडकास्टिंग डिपार्टमेंटला प्राध्यापक म्हणून काम करतात. तर तिची आई एक गृहिणी आहे. या तिच्या विक्रमाची सर्वत्र प्रशंसा होत आहे. तसेच तिच्या आई, वडिलांचेही सर्वत्र अभिनंदन होत आहे. तसेच ऋताच्या पुढील वाटचालीसाठी ”पुणे प्राईम न्यूज”तर्फे तिला हार्दिक शुभेच्छा….!