Friday, July 3, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

जुन्नरमध्ये डॉक्टरच निघाला खाजगी सावकार! बायका, पोरांची विक्री करुन पैसे दे, म्हणून व्यावसायिकाला मारहाण करणाऱ्या डॉक्टरवर गुन्हा दाखल…!

विशाल कदमby विशाल कदम
Sunday, 5 February 2023, 16:49

पुणे : बायका, पोरांची विक्री करुन पैसे दे, असे म्हणून व्यावसायिकाला मारहाण केल्याचा धक्कादायक प्रकार नुकताच उघडकीस आला आहे. याप्रकरणी डॉक्टरच्या विरोधात भारती विद्यापीठ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

विनोद गोपीचंद मेहेर (वय ३९, रा. आळेफाटा, ता. जुन्नर) असे गुन्हा दाखल झालेल्या डॉक्टराचे नाव आहे. याप्रकरणी आंबेगाव खुर्द येथील एका ४६ वर्षाच्या व्यवसायिकाने भारती विद्यापीठ पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी यांचा अ‍ॅग्रो कमोडेटी ट्रेडिंगचा नावाचा व्यवसाय आहे. फिर्यादी यांनी आळेफाटा येथे डॉक्टरी व्यवसाय करणारे विनोद मेहेर यांना आपल्या व्यवसायात पैसे गुंतविण्यास सांगितले. तेव्हा मेहेर यांनी त्यात आपल्याला रस नाही. असे सांगून फिर्यादी यांना ४ टक्के व्याजाने पैसे दिले. आणि फिर्यादी यांना एप्रिल २०१९ मध्ये २५ लाख रुपये दिले. त्यातील २ लाख रुपये डॉक्टरांनी व्याज म्हणून कापून घेतले.

 

दरम्यान, ऑक्टोबर २०१९ पर्यंत व्यवहार सुरळीत सुरु होता. त्यानंतर फिर्यादी यांनी मेहेर यांच्याकडून आणखी २५ लाख रुपये व्याजाने घेतले. फेब्रुवारी व मार्च २०२० मध्ये त्यांनी ३४ लाख ५० हजार रुपयांचा गहू इंदोर येथून घेतला. त्यासाठी ते इंदोर येथे गेले. त्यावेळी लॉकडाऊन पडल्याने ते इंदोरला अडकून पडले.

तेव्हा तेथे माल मिळाला नाही व पैसेही परत मिळाले नाही. नंतर पुण्यात आल्यावर त्यांनी इंदापूर, कराड येथील व्यापार्‍यांशी व्यवहार केला होता. त्या दोघांचे कोरोनामुळे निधन झाले. त्यामुळे २२ लाख रुपये त्यांना मिळाले नाही.त्यामुळे विनोद मेहेर यांची रक्कम फिर्यादी परत करु शकले नाही.

त्यानंतर नोव्हेबर २०२० मध्ये डॉक्टरांच्या गुंडांनी आंबेगाव खुर्द येथील घरी येऊन फिर्यादी यांना लाथाबुक्क्यांनी मारहाण केली. तसेच तुझ्या बायको, पोरांची विक्री करुन पैसे आणून दे. नाही तर तुझ्या घरच्यांना मारुन जीवे ठार मारुन टाकू, अशी धमकी दिली.

याप्रकरणी ४६ वर्षाच्या व्यवसायिकाने भारती विद्यापीठ पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार विनोद मेहेर यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास भारती विद्यापीठ पोलीस करीत आहेत.

विशाल कदम

विशाल कदम

पत्रकारिता क्षेत्रात गत ५ वर्षांपासून कार्यरत. संशोधनात्मक लेखनात विशेष प्राविण्य. राजकारण, उद्योग जगत, आर्थिक घडामोडी, स्टार्टअप, आंतरराष्ट्रीय घडामोडींचे विश्‍लेषण तज्ञ. दैनिक पुण्यनगरी , दैनिक राष्ट्रसह्याद्री मधील कामासह गेल्या दीड वर्षांपासून पुणे प्राईम न्यूज मध्ये बातमीदार म्हणून कार्यरत आहे.

ताज्या बातम्या

दौंड तालुक्यात जेसीबीखाली चिरडून मजुराचा मृत्यू, अपघात लपवण्यासाठी मृतदेह कारच्या डिकीतून नेऊन रस्त्यावर फेकला; गुऱ्हाळ मालकासह चौघांवर यवत पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल..

Friday, 3 July 2026, 13:45

कुंजीरवाडीत एफडीएची मोठी कारवाई! ‘श्री दत्त टी स्टॉल’ मधून 66 हजारांचा प्रतिबंधित गुटखा-पानमसाला जप्त; दुकान आणि गोदाम सीलबंद

Friday, 3 July 2026, 13:26

कुंजीरवाडीत ट्रकच्या केबिनमध्ये राडा, झोपेतून उठवल्याच्या रागातून चालकाचा घेतला चावा आणि टोकदार वस्तूने केला हल्ला

Friday, 3 July 2026, 13:13

…अखेर कदमवाकवस्ती येथील दोन वर्षांच्या सोहमच्या मृत्यूप्रकरणी ठेकेदारावर गुन्हा दाखल!

Friday, 3 July 2026, 13:00

केतन हत्या प्रकरणात मोठा खुलासा! चेतनच्या मित्राला कटाची होती आधीच माहिती; पोलिसांनी घेतले ताब्यात

Friday, 3 July 2026, 12:56

फॅन्सी नंबर प्लेट, कर्कश सायलेन्सरधारकांना इंदापूर पोलिसांचा दणका; ११ हजारांचा दंड

Friday, 3 July 2026, 12:29
Next Post

लोणी काळभोर येथील दोन वर्षाची चिमुकली ऋता ढम हिची वर्ल्ड वाइल्ड बुक ऑफ रेकॉर्डसाठी निवड...!

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.