उरुळी कांचन, (पुणे) : उरुळी कांचन स्वतंत्र पोलीस ठाण्याला ग्रामीण पोलीस ठाण्याचा दर्जा देण्यात यावा, अशी मागणी राष्ट्रवादी हवेली तालुका ओ. बी. सी सेलचे अध्यक्ष सुभाष टिळेकर यांनी राज्याचे विरोधी पक्ष नेते अजित पवार यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.
लोणी काळभोर (ता. हवेली) ग्रामपंचायत हद्दीत १२ कोटी रुपयांच्या विविध विकास कामांचे भूमिपूजन अजित पवार यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी सुभाष टिळेकर यांनी ही मागणी केली. यावेळी जिल्हा नियोजन समितीचे सदस्य संतोष कांचन, उरुळी कांचनचे सरपंच राजेंद्र कांचन, माजी सरपंच संतोष कांचन, सदस्य मयूर कांचन, आदी मान्यवर उपस्थित होते.
दिलेल्या निवेदनानुसार, लोणी काळभोर व लोणीकंद या ग्रामीण पोलिस दलातील दोन पोलिस ठाण्याच्या समावेश पुणे शहर पोलिस आयुक्तालयात १६ मार्च २०२१ ला करण्यात आला होता. राज्य शासनाने लोणी काळभोर पोलीस ठाण्याचे विभाजन करून नवीन उरुळी कांचन पोलीस ठाणे निर्माण करण्यास मान्यता दिली आहे.
पोलीस स्टेशन ग्रामीणमध्ये राहणार आहे. हा निर्णय तात्काळ लागु होणार असल्याने आमदार अशोक पवार यांनी ही पाठपुरावा केला होता. उरुळी कांचन स्वतंत्र पोलीस ठाणे तयार करण्यासाठी सुमारे साडे सहा कोटी रुपयांच्या खर्चास राज्य शासनाकडून मान्यताही देण्यात आली आहे. हे पोलीस स्टेशन ग्रामीणमध्ये राहणार आहे, हा निर्णय तात्काळ लागु होणार असल्याने आमदार अशोक पवार यांनीही पाठपुरावा केला होता.
उरुळी कांचन स्वतंत्र पोलीस ठाणे तयार करण्यासाठी ६ कोटी ४८ लाख २७ हजार ३०० रुपयांच्या खर्चास राज्य शासनाकडून मान्यताही देण्यात आली आहे. दरम्यान, या पोलीस ठाण्यात एकूण १०० पदे भरली जाणार असून यामध्ये १ पोलीस निरिक्षक, ४ सहायक पोलिस निरीक्षक, ५ पोलीस उपनिरीक्षक, २० पोलीस हवालदार, २५ पोलीस नाईक, तर ३० पोलीस शिपाई पदे भरली जाणार आहेत.
दरम्यान, उरुळी कांचन पोलीस दूरक्षेत्र आजूनही लोणी काळभोर पोलीस ठाण्याच्या अंतर्गत सुरु असून पुणे आयुक्तालयास जोडले आहे. त्याचा नाहक त्रास उरुळी कांचनसह परिसरातील नागरिकांना होत असून उरुळी कांचन हे वेगळे पोलीस ठाणे ग्रामीण पोलीस दलात जोडावे अशी मागणी करण्यात आली आहे.