पुणे : येरवडा पोलीस ठाण्याचा परिसर स्वच्छ करणारी आमची दुर्गा मावशी… दुर्गा मावशीनी आज माझ्या सोबत फोटो काढण्यासाठी विनंती केली. त्यामुळे खरं तर मी स्वतः ला भाग्यवान समजतो. कारण एका फोटो मुळे तिच्या चेहऱ्यावर समाधानाच स्मितहास्य होते. ते मी प्रजासत्ताक दिनाच्या निमित्ताने देवु शकलो, असे सहाय्यक पोलीस निरीक्षक बी. ए. ननावरे यांनी या पोस्टद्वारे सांगितले आहे.
दुर्गा मावशी या खूप वर्षापासून येरवडा पोलीस ठाण्याचा परिसर स्वच्छ करीत आहे. परिसर स्वच्छ केल्यानंतर मावशी दिवसभर पोलीस ठाण्यातील झाडांखाली बसतात. दिवसभर मिळालेल्या कामाच्या पैशातून त्या बिस्कीट पूडा किंवा वडा पाव खाण्यासाठी विकत घेत असतात. आणि त्यातील काही भाग कुत्रा, पक्षी व खारुताई (जिच्या जवळ पक्षी-खारुताई सहज येऊन त्यांच्या हातात खाद्य पदार्थ खातात.) असे या पोस्ट मध्ये म्हटले आहे.
माझी पोलीस ठाण्याच्या गुन्हे शाखेच्या पथकात पथक प्रमुख नेमणूक झाली. तेंव्हा सुरुवातीला मला घाबरायची. परंतु, काही दिवसातच मावशी दिवसातून २-३ वेळा जेवण केलं का? म्हणून आस्थेने चौकशी करायची. तर कधी माझ्या गैरहजेरीत माझ्याविषयी स्टाफला साहेब कुठे आहे? अशी विचारणा करायची. मात्र, माझी बदली झाल्यावर माझ्यापेक्षा जास्त माझी दुर्गा मावशी नाराज झाली होती, अशी भावना या पोस्ट मध्ये व्यक्त करण्यात आली आहे.
दरम्यान, ही पोस्ट प्रदीप पाटील यांनी सोशल मिडीयावर व्हायरल केली आहे. या पोस्टला नागरिकांनी भरपूर चांगल्या कमेंट केल्या आहेत. तर नागरिकांनी पोलिस व दुर्गा मावशीचे भरभरून कौतुक केले आहे.