पौड : पौड पोलीस ठाण्याच्या हद्दीतील कोळवण येथील मोबाईल दुकान फोडून चोरी झालेल्या गुन्ह्याची उकल करण्यास पौड पोलिसांना यश आले असून पोलिसांनी एका आरोपीला अटक केली आहे. तर त्याचे आणखी साथीदार फरार असल्याची माहिती पोलीस निरीक्षक मनोजकुमार यादव यांनी दिली.
विजेता रामभाऊ शेखावत असे ताब्यात घेतलेल्या आरोपीचे नाव आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मंगळवारी (ता. ०३) मध्यरात्री कोळवण (ता. मुळशी) ग्रामपंचायत हद्दीतील मातोश्री मोबाईल शॉपी दुकानाचे शटर उचकटुन अज्ञात चोरट्यांनी लॅपटॉप व इतर साहित्य चोरी गेल्याबाबत तक्रार दिली होती.
सदर घटनेचा तपास करीत असताना पोलीस कॉन्स्टेबल साहिल शेख यांना एका खबऱ्याकडून माहिती मिळाली कि, सदर गुन्हयातील आरोपी विजेता शेखावत हा पौड़ कोळवण रोडवर रस्त्याने येणार आहे. मिळालेल्या माहितीच्या अनुशंघाने वरिष्ठांना सदर माहिती देऊन त्यांनी दिलेल्या आदेशानुसार सदर ठिकाणी पोलीस पथकाने सापळा रचून आरोपीला ताब्यात घेतले. त्याच्याकडे अधिक चौकशी केली असता त्याने लॅपटॉप चोरी केल्याची कबुली दिली. तसेच त्याचे आणखी साथीदार फरार असल्याची माहिती पोलिसांना दिली.
सदराची कामगिरी पोलीस अधीक्षक अकीत गोयल, अपर पोलीस अधीक्षक मितेश घटटे, उपविभागीय पोलीस अधिकारी भाऊसाहेब ढोले, पोलीस निरीक्षक मनोजकुमार यादव यांचे मार्गदर्शनाखाली सहायक पोलीस उपनिरीक्षक सचिन शिंदे, पोलीस हवलदार बाबा शिंदे, रॉकी देवकाते, आनंद बाठे, पोलीस कॉन्स्टेबल साहिल शेख, पोलीस नाईक सिध्देश पाटील, गौतम लोकरे, अक्षय यादव यांनी केली आहे.