उरुळी कांचन, (पुणे) : खेडेगावामध्ये सर्व महिलांना एकत्र घेऊन त्यांच्या विचारांची देवानघेवाण होते त्यांच्या कलागुणांना वाव देऊन महिलांसाठी एक व्यासपीठ निर्माण करून देणे हाच या हळदी कुंकुवाचा उद्देश असल्याचे प्रतिपादन टिळेकरवाडी (ता. हवेली) ग्रामपंचायतीच्या सदस्या सुषमा सुभाष टिळेकर यांनी केले.
टिळेकरवाडी (ता. हवेली) ग्रामपंचायत व चंदुकाका सराफ अँन्ड कंपनी यांच्या संयुक्त विद्यमाने महिलांसाठी भव्य – दिव्य अशा हळदी-कुंकू कार्यक्रमाचे आयोजन टिळेकरवाडी या ठिकाणी करण्यात आले होते. यावेळी टिळेकर बोलत होत्या. या कार्यक्रमाला पंचक्रोशीतील सुमारे ४०० व त्यापेक्षा अधिक महिलांनी सहभाग घेतला होता.
यावेळी उरुळी कांचन येथील निसर्ग उपचार आश्रम येथील डॉ. समृद्धी व्यास, हवेली तालुका राष्ट्रवादी ओ.बी.सी.सेलचे अध्यक्ष सुभाष टिळेकर, हवेली पंचायत समितीच्या माजी सदस्या संगीता टिळेकर, सरपंच सुभाष लोणकर, उपसरपंच नंदा राऊत, श्रीदत्त सेवा ट्रस्टचे अध्यक्ष संतोष टिळेकर, रूपाली लोणकर, मायाताई टिळेकर, ग्रामपंचायत सदस्य गणेश टिळेकर, गोवर्धन टिळेकर, कल्पना टिळेकर वैशाली चौरे, ग्रामसेविका स्वाती राजगुरू आदी मान्यवर व महिला उपस्थित होत्या.
दरम्यान, चंदुकाका सराफ अँन्ड कंपनीचे गणेश यवाद व त्यांच्या सहकाऱ्यांनी सर्व महिलांना चांदीच्या वाटीचे वान देऊन “वान सौभाग्याचे गोडवा नात्याचा” हा संदेश यावेळी देण्यात आला. कार्यक्रमाचे स्वागत व प्रास्ताविक सुषमा टिळेकर यांनी केले तर आभार वैशाली चौरे यांनी मानले.