लोणी काळभोर : कुंजीरवाडी (ता. हवेली) येथील एका पेट्रोल पंपावर दरोडा टाकण्याच्या डाव दरोडेखोरांचा लोणी काळभोर पोलीसांच्या चाणाक्ष नजरेमुळे फसला आहे. पोलिसांनी ४ दरोडेखोरांना आळंदी म्हातोबाची ग्रामपंचायत हद्दीतील रेल्वे ब्रिजचे जवळून अटक सोमवारी (ता.२३) रात्री दोन सव्वादोन वाजण्याच्या सुमारास अटक केली आहे.
त्यांच्याकडून २ लोखंडी पालयन, मिरची पुड, बॅटरी, नायलॉन दोरी, एक घट्ट चिकटपट्टी अशा वस्तु जप्त करण्यात आल्या आहे.
प्रेम राजु लोंढे (वय १९ रा. रेल्वे गेटजवळ आळंदी रोड (ता. हवेली जि पुणे मुळ रा. जामखेड, गोरोबा थीएटर जवळ, अहमदनगर), ऋषिकेश उत्तम लोंढे (वय २६, रा. पानमळा रोड ता हवेली जि. पुणे मुळ रा. बावळगाव जि. बिड), गणेश भगवान खलसे वय २२ वर्षे रा. माळवाडी कुंजीरवाडी ता हवेली जि पुणे) व तानाजी भाऊसाहेब गावडे (वय २३ रा. माळवाडी -कुंजीरवाडी ता हवेली जि पुणे) अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत. तर दोन आरोपी अंधाराचा फायदा घेऊन फरार झाले आहेत.
लोणी काळभोर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक दत्तात्रय चव्हाण यांनी दिलेल्या माहितीनुसार, शहरात कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होवु नये. जनतेचे रक्षण व्हावे. तसेच कोणत्याही प्रकारचा अनुचीत प्रकार पडु नये.
यासाठी पुणे शहरातील गुन्हेगार, बेकायदेशीर धंदे करणारे, अंमली पदार्थ विक्रीचे रॅकेट चालवणारे, पोलीस अभिलेखावरील टोळीतील गुंड, दरोडा, जबरी चोरी, घर फोडी चांन्या करणारे तसेच शरीर व मालमत्ते विरुद्ध गुन्हे करणारे व लोकांमध्ये दहशत करणारे सराईत गुन्हेगारांचा शोध घेवून त्यांच्या हालचालींवर नजर ठेवणे.
त्यांच्याविरुद्ध कठोर कारवाई करून त्यांचे समुळ उच्चाटण करण्यासाठी पोलीस आयुक्त रितेश कुमार यांनी पोलिसांना आदेश दिले होते.
प्रजासत्ताक दिनाचे अनुषंघाने लोणीकाळभोर पोलीस ठाण्यातील तपास पथक अधिकारी पोलीस उपनिरीक्षक अमित गोरे व त्यांचे सहकारी हॉटेल, लॉज चेक करणे, तसेच पाहीजे व फरार आरोपीचा शोध घेण्यासाठी गस्त घालत होते.
गस्त घालत असताना, बीट मार्शल धनश्याम आडके व ईश्वर भगत यांना कॉल प्राप्त झाला की, “७ ते ८ इसम हे म्हातोबाची आळंदी रेल्वे ब्रिजचे जवळ हत्यारासह थांबले असून ते येणाऱ्या जाणाऱ्या लोकांना अडवत आहेत” अशी माहिती मिळालेली माहिती पोलिसांनी त्वरित वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दिली.
पोलीस निरीक्षक दत्तात्रय चव्हाण यांनी तातडीने एक पथक तयार करून घटनास्थळी पाठवून दिली. सदर पथक घटनास्थळी दाखल झाले असता, पोलिसांना म्हातोबाची आळंदी रेल्वे ब्रिजच्या पलीकडे उजव्या बाजुच्या वळणावर पाच ते सहा इसम पळुन जात असल्याचे दिसून आले.
पोलिसांनी मोठ्या शिताफीने चार जणांना ताब्यात घेतले. तर दोन इसम अंधाराचा फायदा घेवुन तेथेन पळुन गेले. त्यांच्याकडून २ लोखंडी पालयन, मिरची पुड, बॅटरी, नायलॉन दोरी, एक घट्ट चिकटपट्टी अशा वस्तु जप्त करण्यात आले आहे.
दरम्यान, पोलिसांनी आरोपी प्रेम लोंबे याला ताब्यात घेऊन अधिक चौकशी केली असता, आरोपीने त्याचे पाच साथीदार मिळून कुंजीरवाडी येथील अँटोकॉर्नर एच पी पेट्रोल पंप, (ता. हवेली जि .पुणे) या ठिकाणी दरोडा टाकण्यासाठी चाललो होतो. अशी कबुली पोलिसांना दिली आहे. आरोपींच्या विरोधात लोणी काळभोर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलीस फरार झालेल्या दोन्ही आरोपींच्या मागावर आहेत. पुढील तपास लोणी काळभोर पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक उपनिरीक्षक अमित गोरे करीत आहेत.
सदरची उल्लेखनीय कामगीरी लोणी काळभोर पोलीस ठाण्याचे वरीष्ठ पोलीस निरीक्षक दत्तात्रय चव्हाण, पोलीस निरीक्षक (गुन्हे) सुभाष काळे यांच्या मार्गदशनाखाली तपास पथकातील अधिकारी पोलीस उपनिरीक्षक अमित गोरे, उपनिरीक्षक वैभव मोरे, पोलीस हवालदार नितीन गायकवाड, आनंद पाटोळे, पोलीस नाईक सुनिल नागलीत, श्रीनाथ जाधव, नितेश पुंडे, शैलेश कुदळे, निखील पवार, दिपक सोनवणे, बाजीराव वीर, विश्रांती फणसे, धनश्याम आडके व ईश्वर भगत यांच्या पथकाने केली आहे.