लोणी काळभोर, (पुणे) : कदमवाकवस्ती (ता. हवेली) ग्रामपंचायतीच्या सदस्या राणीताई विजय बडदे यांच्या वाढदिवसानिमित्त सर्वसामन्य नागरिकांना आवश्यक असलेल्या शाशकीय योजनांचे आयोजन करण्यात आले होते. यामध्ये भव्य मोफत आधारकार्ड शिबीर, सुकन्या समृद्धी योजना व भारतीय डाक विभागाची लाभदायी योजना ज्या माध्यमातून ३९९ रुपये मध्ये १० लाख रुपयांपर्यंतचा अपघाती विमा निघू शकतो. अश्या विविध योजनाचे आयोजन करण्यात आले होते.
कदमवाकवस्ती (ता. हवेली) ग्रामपंचायत हद्दीतील संभाजीनगर परिसरातील रेनबो स्कूल या ठिकाणी या योजनांचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमाचे उद्घाटन ह.भ.प. विनोद महाराज काळभोर यांच्या हस्ते करण्यात आले.
यावेळी कदमवाकवस्तीच्या सरपंच गौरी गायकवाड, नवपरिवर्तन फौंडेशनचे अध्यक्ष चित्तरंजन गायकवाड, पंचायत समितीचे माजी उपसभापती सनी काळभोर, कुंजीरवाडीचे माजी सरपंच सचिन तुपे, लोणी काळभोरचे माजी उपसरपंच योगेश काळभोर, पुणे जिल्हा भाजपाचे उपाध्यक्ष प्रविण काळभोर, रेनबो स्कूलचे चेअरमन नितीन काळभोर, उदय काळभोर, लोणी काळभोर ग्रामपंचायत सदस्य गणेश कांबळे, युवा नेते अभिजित बडदे, प्रसाद कदम, अविनाश बडदे, ग्रामपंचायत सदस्य माधुरी काळभोर, राजश्री काळभोर, सचिन दाभाडे, नासिर पठाण, आदी मान्यवरांच्या उपस्थितीत उद्घाटन समारंभ पार पडला.
दरम्यान, या उपक्रमासाठी नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद पहायला मिळाला, विविध योजना तसेच मोफत आधार कार्ड मोहीम याचा अनेक नागरिकांना फायदा झाला. तसेच दिवसभर ग्रामपंचायत सदस्या राणीताई बडदे यांच्या वाढदिवसानिमित्त अनेक नागरिकांनी उपस्थित राहून शुभेच्छा दिल्या.