पुणे : किराणामाल दुकानदाराने हप्ता न दिल्याच्या रागातून दुकानदारावर चाकूने वार केल्याची घटना धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. ही घटना कोथरूडमधील तुलशी सुपर शॉपीत शुक्रवारी (ता.२०) रात्री साडेनऊ वाजता घडली आहे. याप्रकरणी तीन जणांविरोधात अलंकार पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
दिलीप चौधरी (वय. ३२) असे फिर्याद दिलेल्या दुकानदाराचे नाव आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, दिलीप हे तुलसी सुपर शॉपीचे मालक आहे. शुक्रवारी (ता. २०) रात्री सुमारास ते दुकानात थांबले होते. त्यावेळी दुचाकीवर आलेल्या तिघांपैकी एकाने शॉपीत येऊन दिलीप यांच्याकडे हप्त्याची मागणी केली. मात्र, दिलीप यांनी कसले पैसे द्यायचे, असे विचारले असता, चोरट्यांनी शॉपीतील पैशांचा गल्ला उघडून लुटीच्या उद्देशाने चोरीचा प्रयत्न केला.
त्यांच्या दुकानातील स्कॅन मशीन चोरून नेऊ लागले असता, दिलीपने त्यांना अडविले. त्यावेळी चोरट्याने त्यांच्यावर चाकूने वार करून गंभीर जखमी केले.
दरम्यान, दुकानदार दिलीप चौधरी यांनी याप्रकणी अलंकार पोलिस ठाण्यात फिर्याद दिली असून, त्यानुसार तीन जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेचा पुढील तपास पोलीस करत आहेत