दीपक खिलारे
इंदापूर : इंदापूर पोलीस ठाणे अंकित बावडा दूरक्षेत्र हद्दीतील लाखेवाडी येथे चालणाऱ्या अवैध गावठी हातभट्टी दारू व मटक्यावरती इंदापूर पोलिसांनी छापा टाकून दोन लाख पंधरा हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे.
सदर कारवाईमधील इसमांवरती भारतीय दंड विधानसहिता कलम ३२८ व महाराष्ट्र दारूबंदी कायदा अन्वये गुन्हा दाखल करण्याची तसेच अवैधरिता मटका चालवणारे दोन्ही इसमांवरती यांच्यावरती महाराष्ट्र जुगार बंदी अधिनियम कलम १२ (अ) अन्वये गुन्हा दाखल केला आहे.
सहाय्यक पोलीस निरीक्षक नागनाथ पाटील यांना बेकायदेशीर हातभट्टी दारू विक्री करत असल्याची गोपनीय माहिती मिळाली. त्यानुसार त्यांनी सदरची माहिती पोलीस निरीक्षक प्रदीप सुर्यवंशी यांना देऊन त्यांच्या आदेशाने मोजै लाखेवाडी येथील दोन इसम उसाच्या शेतामध्ये शरीरास अपायकारक रसायन तयार करत असल्याचे निदर्शनात येताच तेथे छापा टाकला.
यामध्ये दोन लाख बारा हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. तसेच तेथेच चालू असलेल्या मटक्यावरही छापा टाकून तीन हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला.
सदरची कारवाई पुणे ग्रामीणचे पोलीस अधीक्षक अंकित गोयल, बारामतीचे अप्पर पोलीस अधीक्षक आनंद भोईटे, बारामती विभागाचे उपविभागीय पोलीस अधिकारी गणेश इंगळे यांच्या मार्गदर्शनाखाली व इंदापूर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक प्रदीप सुर्यवंशी यांच्या देखरेखीखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक नागनाथ पाटील, महिला पोलीस हवालदार खंडागळे, पोलीस नाईक हेगडे, पोलीस शिपाई दिनेश कांबळे व शिंदे यांनी केली.