पुणे : घरातील ५० तोळ्याच्या सोन्याच्या दागिन्यांवर पत्नीनेच डल्ला मारल्याची धक्कादायक घटना धनकवडी येथील कमल व्हिला सोसायटी परिसरातून उघडकीस आली आहे. याप्रकरणी एका महिलेच्या विरोधात सहकारनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
स्मिता प्रदिप केंदळे (वय-४५, सध्या रा. बिबवेवाडी) असून गुन्हा दाखल झालेल्या महिलेचे नाव आहे. याप्रकरणी तिचा पती प्रदिप वसंत केवळे (वय ५२, धंदा जीम ट्रेनर, रा. कमल व्हिला सोसायटी. इस्कॉन मंदीर जवळ, गोकुळ नगर कात्रज कोंढवा रोड पुणे) यांनी सहकारनगर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, प्रदिप केवळे व त्यांचे सर्व कुटुंबीय हे (रा. कमल व्हिला सोसायटी. इस्कॉन मंदीर जवळ, गोकुळ नगर कात्रज परिसरात राहतात) तर जीम ट्रेनर म्हणूनहि काम करतात. तसेच त्यांची पत्नी स्मिता हिच्याशी कौटुंबीक कारणाने सतत वाद घालत असल्याने २०१४ ला धनकवडी पुणे येथील राहत्या घरातून कात्रज पुणे येथे स्वतंत्र राहण्यास गेले होते. यावेळी जवळचे सर्व सोन्याचे दागीने एका कपाटातील लॉकरमध्ये ठेवुन लॉकर लॉक करून चावी घेवुन गेलो होतो.
दुसरीकडे राहण्यासाठी जाताना २०१५ साली पत्नी स्मिता घर सोडून गेली. तिने जाताना तुझ्या बेडरूममधील कपाट कशानेतरी उघडून त्या कपाटातील तुझे सोन्याचे दागीने नेले होते. २०१८ साली घरी गेलो त्यावेळी माझी पत्नी स्मिता तेथेच परत राहण्यासाठी आली होती. ती माझे दागीने परत वारेल यामुळे मी तिला विचारले नाही व कोठे तक्रार दिली नाही. त्यावेळी मी साधारण १५ दिवस आई वडीलाकडे राहुन पुन्हा कात्रज पुणे येथे राहण्यास गेलो.
दरम्यान, २०२० साली परत धनकवडी पुणे येथे माझे आई वडीलांकडे राहण्यास आलो. साधारण एक महिण्यात माझी पत्नी स्मिता माझ्याशी वाद घालून घर सोडून निघुन गेली त्या कालावधीत तिने माझे दागीनेबाबत मला काही सांगीतले नाही. माझी पत्नी स्मिता केंदळे हिने आमचे राहते घर सन २०१५ साली सोडुन जाताना मला काही एक न सांगता माझे कपाटातील सोन्याचे दागीने माझे संमती शिवाय नेले असुन ते अद्यापपर्यंत तिने मला परत केले नाहीत. म्हणून प्रदीप केंदळे यांनी पत्नीविरोधात ३ लाख ०६ हजार ५०० रुपयांचे ५० तोळे दागिने चोरून नेल्याची तक्रार सहकारनगर पोलीस ठाण्यात दिली आहे.