लहू चव्हाण
पाचगणी : पाचगणी (ता.महाबळेश्वर) येथील स्वीट मेमेरिज हायस्कूल येथे दि.२१ आणि २२ जानेवारी २०२३ रोजी प्रसिद्ध कविवर्य अरुण दादा म्हात्रे यांच्या अध्यक्षतेखाली “कविता : तुझी आणि माझी!” आयोजित काव्य महोत्सव आणि कविसंमेलन मोठ्या थाटामाटात साजरा होणार आहे.
सदर संमेलनास महाराष्ट्र राज्य शालेय शिक्षणमंत्री मा. दिपकजी केसरकर वाई-खंडाळा-महाबळेश्वर मतदार संघाचे जननायक आमदार मकरंद (आबा) पाटील यांची प्रमुख उपस्थिती राहणार आहे.
या संमेलनास चित्रपट अभिनेते सयाजी शिंदे, अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ अध्यक्ष मेघराज राजेभोसले, गुरुनाथ मिठबावकर, उद्योजक मयूर व्होरा, मा.उपमहापौर केशवदादा घोळवे, आशिष राजे, अनिल जाहीर, गौतम सातदिवे, चंद्रकांत पवार, संग्रामसिंह नलावडे, मुख्याधिकारी गिरीश दापकेकर, माजी नगराध्यक्षा लक्ष्मीताई कऱ्हाडकर, युवासेना महाबळेश्वर तालुकाप्रमुख नितीनभाई भिलारे, मा. महापौर राहुलदादा जाधव, पुरुषोत्तम जाधव आदी मान्यवर उपस्थित राहणार आहेत.
महाराष्ट्र साहित्य परिषदेचे कार्याध्यक्ष कविवर्य उद्धव कानडे, कवी चंद्रकांत वानखेडे, कवी प्रकाश होळकर, कवी हनुमंत चांदगुडे, कवी नारायण सुमंत, कवी संपत गर्जे, श्रीकांत पाटील, कवयित्री कविता कदम, गझलकार संजय पवार आणि इतर मान्यवर कवी, कवयित्री उपस्थित राहणार आहेत.
दरम्यान, या काव्य सोहळ्यास अधिकाधिक संख्येने सहभागी व्हावे असे आवाहन समूह संस्थापक ज्ञानेश सूर्यवंशी यांनी केले आहे. अधिक माहितीसाठी 9921297001/ 9922409358 या क्रमांकावर संपर्क साधावा.