पुणे : माती विभागातील सोलापूरचा सिकंदर शेख आणि पुण्याचा महेंद्र गायकवाड यांच्यात उपांत्य सामना पार पडला. या सामन्यात महेंद्र गायकवाडचा विजय झाला असून सिकंदर शेख पराभूत झाला आहे.
सिकंदर शेख आणि महेंद्र गायकवाड यांनी आधी सावध पवित्रा घेतला. सावध पवित्र्यानंतर महेंद्र गायकवाडने तीन मिनिटांच्या पहिल्या फेरीत एक गुण घेत आघाडी मिळवली. महेंद्रने आघाडी घेतल्यानंतर सिकंदरने प्रतीडाव टाकत दोन गुण पटकाले. पहिल्या फेरीत सिकंदर शेख २-१ गुणांनी आघाडी घेतली.
पुढच्या फेरीत महेंद्र गायकवाडने ४ गुण मिळवत आघाडी पिछाडी भरून काढत सिकंदर शेखवर ५-४ अशी आघाडी घेतली. सिकंदर आणि महेंद्र यांच्यात एक एक गुणासाठी चढाओढ सुरू झाली.
दरम्यान, शेवटच्या मिनिटाला दोन्ही पैलवानांनी गुण मिळवण्यासाठी चांगलीच झटापाट सुरू केली होती. एकमेकांवर पकड मिळवण्यासाठी दोन्ही कुस्तीपटू झुंजत होते. अखेर महेंद्र गायकवाडने एक गुण घेत कुस्ती जिंकली.