बारामती : ‘मी क्राईम ब्रँचचा पोलिस आहे’, असे सांगून एका जेष्ठ नागरिकाची ४० हजार रुपयांचे दागिने लंपास केल्याची घटना बारामती येथे घडली आहे. याप्रकणी दोन अज्ञात व्यक्तींविरोधात बारामती पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
विठ्ठल गोविंद पोतेकर (वय 70, रा. माऊली बंगला, पूर्वा कॉर्नरशेजारी, बारामती) यांनी याबाबत फिर्याद दिली आहे.
मिळालेल्या माहिती नुसार, फिर्यादी पोतेकर हे कटिंग व दाढी करण्यासाठी पूर्वा कॉर्नरनजीक एका दुकानाकडे निघाले होते. या वेळी दुचाकीवरून एक इसम आला. त्याने पोतेकर यांना सांगितले की, मी क्राईम ब्रँचचा पोलिस आहे, काल चोरीचा प्रकार घडला आहे. तुमच्याकडील दागिने रुमालात ठेवा. तसेच त्यांतर त्याने नकली ओळखपत्र दाखवत फिर्यादीचा विश्वासन संपादन केला.
त्यानंतर फिर्यादीने गळ्यातील सोन्याची साखळी व हातातील अंगठी, मोबाईल व पाकीट हे रुमालामध्ये बांधले. याच वेळी तेथे अन्य एक अनोळखी व्यक्ती आला. त्याने तेथे अगोदर उपस्थित असलेल्याला येथे झालेल्या चोरीचे काय झाले, असे म्हणत पोतेकर यांच्याकडील रुमाल दुचाकीवर ठेवला.
दरम्यान, फिर्यादी त्यांना ते रुमाल येथून तेथून लगेच पसार झाले. त्यानंतर फिर्यादीने रुमाल उघडून बघितला असता त्यात मोबाईल व पाकीट होते. परंतु, सोन्याची साखळी व अंगठी चोरीला गेल्याचे दिसून आले. पोतेकर यांनी लगेच बारामती पोलीस ठाण्यात याप्रकणी फिर्याद दिली . त्यानुसार दोन अज्ञात व्यक्तींविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून या घटनेचा पुढील तपास पोलीस करीत आहेत.