हडपसर : मोदी सरकारच्या कल्याणकारी योजना स्मिता गायकवाड यांनी जनसामान्यापर्यंत पोहोचविल्या आहेत. अशा प्रामाणिक कार्यकर्त्यांमुळे हडपसर विधानसभा मतदारसंघात आगामी निवडणुकांमध्ये भाजपा बाजी मारेल. असा विश्वास भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी हडपसरमध्ये बोलताना व्यक्त केला.
भाजप ओबीसी मोर्चा पुणे शहर उपाध्यक्ष स्मिताताई गायकवाड यांच्या जनसंपर्क कार्यालयाचा उदघाटन समारंभ आयोजित करण्यात आला होता. यावेळी उदघाटक या नात्याने चंद्रशेखर बावनकुळे हे बोलत होते. यावेळी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी भाजप पुणे शहर अध्यक्ष जगदीश मुळीक, भाजप ओबीसी मोर्चा प्रदेश अध्यक्ष आमदार योगेश टिळेकर, भाजप प्रदेश सरचिटणीस विक्रांत पाटील, प्रदेश सरचिटणीस विजय चौधरी, पुणे जिल्हा संघटन सरचिटणीस धर्मेंद्र खांडरे आदी मान्यवर उपस्थित होते.
यावेळी बोलताना माजी आमदार योगेश टिळेकर, शहर अध्यक्ष श्री. जगदीश मुळीक यांनी स्मिताताई गायकवाड यांनी अनेक सामाजिक- राजकीय उपक्रमांमधून भाजप तळागाळात मजबूत करण्याचे काम केले असून त्यांचे राजकीय भवितव्य उज्वल असल्याचे सांगितले.
यावेळी बोलताना स्मिताताई गायकवाड यांनी सांगितले की, हडपसर मतदारसंघात माजी आमदार योगेश टिळेकर यांनी मोठ्या प्रमाणावर विकासकामे सुरु केली होती पण मागच्या महा विकास आघाडी सरकारच्या अडीच वर्षाच्या काळात ही कामे ठप्प झाल्याने जनता त्रस्त झाली होती. सुदैवाने ते भ्रष्ट सरकार जावून ‘ शिंदे – फडणवीस ‘ सरकार राज्यात आल्यापासून परत येकदा विकासला गती मिळत आहे.
येणाऱ्या प्रत्येक निवडणुकीत योगेश टिळेकर यांच्या नेतृत्वात हडपसर मतदारसंघात भव्य विजय मिळवायचा दृढ निर्धार करूया असे सांगून आगामी काळात मला पक्षाने मोठी राजकीय संधी दिल्यास यशस्वी करून करून दाखवेन असा विश्वास यावेळी स्मिताताई गायकवाड यांनी बोलताना व्यक्त केला.
दरम्यान, या प्रसंगी प्रमुख पाहुण्यांचे स्वागत व सत्कार फुले, पगडी, शाल, पुष्पगुच्छ व ‘श्री विठ्ठल आणि संत ज्ञानदेव – तुकाराम’ यांची सुबक शिल्प भेट देऊन स्मिताताई गायकवाड व तुषार गायकवाड यांनी केला. यावेळी स्मिताताई गायकवाड यांच्या ‘कार्य अहवाल’ आणि ‘२०२३ दिनदर्शिका’ यांचे प्रकाशन प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे व इतर उपस्थित मान्यवरांच्या शुभहस्ते करण्यात आले.
यावेळी ५०० कष्टकरी महिलांना थंडी पासून बचावासाठी मोफत स्वेटर चे वाटप केले.तसेच ‘गौरी – गणपती सजावट स्पर्धा २०२२’ च्या विजेत्या स्पर्धकांना पारितोषिक वितरण करण्यात आले.
यावेळी भाजपचे पुणे शहर संघटन सरचिटणीस राजेश पांडे, पुणे शहर सरचिटणीस गणेश घोष, पुणे शहर सरचिटणीस संदीप लोणकर, हडपसर विधानसभा अध्यक्ष संदीप दळवी, पुणे जिल्हा उपाध्यक्ष राहुल शेवाळे, नगरसेवक मारुती तुपे, पुणे शहर सचिव शशिकांत कुलकर्णी, नगरसेविका उज्वला जंगले, जिल्हा परिषद सदस्य वंदना कोद्रे, महिला आघाडी अध्यक्ष सौ. स्वाती कुरणे, हडपसर मतदारसंघ संघटन सरचिटणीस गणेश घुले, जीवन जाधव, सुभाष जंगले, सुनील धुमाळ, प्रमोद सातव, माजी नगरसेविका विजया वाडकर,भाजप नेते अविनाश मगर, संतोष शिंदे, बंडू कचरे, राजेंद्र पाषाणकर, शशिकांत कुलकर्णी, सागर बारदोस्तकर, अभिजित बोराटे, निखिल शिंदे, महेश ससाणे,युवराज मोहरे,उद्धव पांचाळ,योगेश सूर्यवंशी, सचिन इचके, शोभा लगड,सीमा ताई शेंडे,अर्चना पाटील,पल्लवी केदारी, छाया गदादे, दिपाली माटे, भगतसिंग कल्याणी, भाजप महिला आघाडीच्या शारदा पानमंद, माधुरी गिरमकर, स्मिता लडकत, संगीता पाटील, मोहिनी शिंदे, नेहा निंगाले, ऊत्तम बांदल, मीना पिंटो, पूनम फरांदे, ग्रेटा, निकिता निंगाले, सुनीता पाटील, रुपाली पाटील, वैशाली पाटील, विशाखा सुतार, अनिता हिंगणे यांच्यासह नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन विलास बडे यांनी केले तर आभार प्रदर्शन भारतीय जनता पार्टी हडपसर विधानसभा मतदारसंघाचे अध्यक्ष संदीप दळवी यांनी केले. तर हा कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी स्मितसेवा फाउंडेशनच्या कार्यकर्त्यांनी परिश्रम घेतले.