अजित जगताप
वडूज : माणसाच्या अंगी जिद्द असली की त्यांना निश्चितच यश मिळते. याचे ज्वलंत उदाहरण म्हणजे प्रतिकूल परिस्थिती असतानाही स्वतः जिद्दीने अभ्यास करून व मोबाईलचा अति वापर न करता डाळ मोडी (ता. खटाव) येथील युवक श्रीकांत पाटोळे यांची पोलीस उपनिरीक्षक पदी निवड झाली आहे.
काही वर्षांपूर्वी वडूज नगरीचे सामाजिक कार्यकर्ते व सर्वसामान्य माणसांना मार्गदर्शन करणारे बनाजी पाटोळेसर यांनी जय मल्हार अकॅडमीच्या माध्यमातून वडूज (ता. खटाव) जय मल्हार पोलीस भरती पूर्व प्रशिक्षण केंद्र सुरू केले. आणि बघता बघता हे केंद्र म्हणजे भरतीपूर्व यशाचे गमक ठरले आहे.
२०१६ साली श्रीकांत पाटोळे यांनी जय मल्हार अकॅडमी मध्ये प्रवेश केला भरती पूर्व प्रशिक्षण चांगल्या गतीने यशस्वी केले. आणि पहिल्याच प्रयत्नात राज्य राखीव पोलीस दलातून त्यांची निवड झाली. त्यावेळी ते सोलापूर येथे गट क्रमांक १० मध्ये कार्यरत होते.
परंतु, आपणही फौजदार व्हावे हे त्यांचे स्वप्न त्यांना झोपू देत नव्हते. त्यांनी बारा बारा तास अभ्यास केला. तसेच वेळोवेळी बनाजी पाटोळेसर यांचे मार्गदर्शन घेतले आणि अखेर ते फौजदार झाले. या दुहेरी यशामुळे त्यांना मनस्वी आनंद वाटत आहे. ग्रामीण भागातील मुलांनी जिद्द कायम ठेवून जर यश मिळवायचा असेल तर अनेक गोष्टींचा त्याग करावा लागतो.
पहाटे थंडी- वारा- पाऊस याची पर्वा न करता सकाळी लवकर उठून अभ्यास व शारीरिक कवायत करणे. अशा माध्यमातून श्रीकांत पाटोळेसर यांना यश मिळाले आहे. ते लवकर नाशिक येथील पोलीस उपनिरीक्षक प्रशिक्षण केंद्रांमध्ये दाखल होणार आहेत.
खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर, आमदार जयकुमार गोरे, नगराध्यक्षा सौ मनिषा काळे, रा स प जिल्हा युवक अध्यक्ष श्रीकांत देवकर, जनता क्रांती दलाचे सत्यवान कमाने, रिपब्लिकन पक्षाचे नेते अजित कंठे,सामाजिक कार्यकर्ते दत्ता केंगारे,आनंदा साठे, मनसेचे संघटक सुरज लोहार, रिपब्लिकन पक्षाचे खटाव तालुका अध्यक्ष गणेश भोसले, आणि ज्येष्ठ मार्गदर्शक शशिकांत पाटोळे, नंदकुमार गोडसे,गणेश गोडसे, बागायतदार शेतकरी मोहन काळे-पाटील तसेच डॉ. महेश गुरव,इम्रान बागवान, राजू फडतरे,अजित जगताप,विजय शेटे, विजयकुमार शिंदे,परेश जाधव, संतोष हिंगसे, कुणाल गडांकुश,प्रतिक बडेकर, विजय बोराटे, विक्रम रोमण, गोविद भंडारे,निवास कदम,संजय काळे,महादेव सकट, राजेंद्र चव्हाण,वंचित बहुजन आघाडीचे विश्वास जगताप,धनंजय चव्हाण, वडूज नगरीचे सर्व नगरसेवक-नगरसेविका, आदी मान्यवरांनी श्रीकांत पाटोळे यांचे अभिनंदन केले आहे.