पुणे : बारावीत शिकणाऱ्या एका विद्यार्थिनीने सिंहगड रस्त्यावरील कालव्यात उडी मारल्याची धक्कादायक घटना घडली आहे. ही घटना सोमवारी (ता.९ ) घडली आहे. तरुणीचा अजूनही शोध लागलेला नाही.
श्रावणी नितीन वानखेडे असे उडी मारलेल्या विद्यार्थिनीचे नाव आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहिती नुसार, श्रावणी सिंहगड रस्त्यावरील एका महाविद्यालयात शिक्षण घेत आहे. सोमवारपासून तिची पूर्वपरीक्षा सुरू झाली. दुपारी ती महाविद्यालयात गेली. अर्धवट प्रश्नपत्रिका सोडवून ती वर्गातून बाहेर पडली.
त्यानंतर ती मोबाइलवर बोलत कालव्याजवळ गेली आणि तिने कालव्यात उडी मारली. तेथून जात असलेल्या दोन तरुणांनी हा प्रकार पाहिला. त्यांनी लगेच पोलिसांना व अग्निशमन दलाला या घटनेची माहिती दिली.
दरम्यान, रात्री उशिरापर्यंत तिचा शोध घेण्यात आला. मात्र, अजूनही तिचा शोध लागलेला नाही. अशी माहिती सिंहगड रस्ता पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक शैलेश संखे यांनी दिली आहे.