अजित जगताप
सातारा : शिक्षण माता सावित्रीबाई फुले व महात्मा फुले यांची प्रेरणा घेऊन शिक्षण क्षेत्रात पाऊल टाकणाऱ्या पहिल्या मुस्लिम शिक्षिका प्रतिमा शेख यांची खटाव तालुक्यातील वडूज नगरीमध्ये भव्य दिव्य प्रमाणात जयंती साजरी करण्यात आली. वडूज नगरीतील सामाजिक कार्यकर्ते डॉ. नारायण बनसोडे, सत्यवान कमाने, इम्रान बागवान, अजित जगताप व अजित कंठे, महादेव सकट आदी मान्यवरांच्या उपस्थितीमध्ये जयंती साजरी करण्यात आली.
छत्रपती शिवाजी महाराजांना अभिप्रेत असलेले स्वराज्य स्थापन झाले असले तरी आज युगपुरुषांचे नाव घेऊन इतिहास बदलण्याचा कुटिल डाव सुरू आहे. छत्रपती संभाजी महाराज हे स्वराज्य रक्षक होते ही व्यापक दृष्टिकोन सोडून फक्त ते धर्मवीर होते. असा धार्मिक तंटे वाढवण्यासाठी उपयोग केला जात आहे. हे युवा पिढी नाकारू लागले आहे. हे खरं म्हणजे युगपुरुषांच्या विचाराची यश आहे.
आज विविध जाती धर्मातील लोक युगपुरुषांचे गुणगान गात असल्यामुळे सनातनी आणि जुन्या रूढी परंपराला कंटाळलेले मूठभर लोक समाजाची दिशाभूल करीत आहेत. अंधभक्त लोकांना मार्ग सापडत नाही. त्यामुळे धार्मिक तंटे वाढवण्याच्या दृष्टीने काही व्यक्ती कार्य करत आहेत. त्याकडे दुर्लक्ष करणे हीच खऱ्या अर्थाने युगपुरुषांना श्रद्धांजली ठरेल. अशा शब्दात अनेक मान्यवरांनी आपल्या भावना व्यक्त केल्या.
या कार्यक्रमाला सिकंदर मुल्ला, शकील मुल्ला, याकूब बागवान,सिराज मुल्ला,सिराज शिकलगार, बरकत मुल्ला इसाक मुल्ला, मुबारक शिकलगार ,जलील मुल्ला,सुरज सातपुते, मोहम्मद शरीफ आत्तार, सागर कुंभार, समीर आत्तार ,सैफ मुल्ला व वडूज मुस्लिम जमात, रिपब्लिकन पक्ष, जनता क्रांती दल, फुले-शाहू-आंबेडकर विचार मंच व इतर संघटनेचे कार्यकर्ते उपस्थित होते.
प्रारंभी आदरणीय फातिमा शेख यांच्या प्रतिमेला पुष्पचक्र अर्पण करून त्यांना विनम्र अभिवादन करण्यात आले. त्यानंतर झालेल्या समारंभात अनेक मान्यवरांनी त्यांच्या कार्याचा गौरव करताना क्रांतिकारक महिला मुक्ता साळवे, लहुजी वस्ताद, डॉ. बाबासाहेब आंबेडकर, महात्मा फुले, छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती संभाजी महाराज, मौलाना आझाद, लोकशाहीर अण्णाभाऊ साठे आदी मान्यवरांच्या जयघोष करून कार्यक्रमाची शोभा वाढवली. फातिमा शेख यांची जयंती राज्य सरकारने सुरू करावी यासाठी प्रयत्न केले जाईल अशी ग्वाही मुस्लिम समाजातील पुरोगामी विचाराच्या कार्यकर्त्यांनी बोलून दाखवली .त्याला उदंड प्रतिसाद मिळाला आहे.