पुणे : निगडी येथे जबरी चोरी करून महिलेच्या डोक्यात धारदार कोयत्याने सपासप वार खून करणाऱ्या सराईत गुन्हेगाराला जन्मठेपसह ५ हजार रुपये दंड, पुरावा नष्ट केल्याप्रकारणी ३ महिने साधा कारावास, जबरी चोरीच्या गुन्हयासाठी ७ वर्षे सक्षम कारावास आणि ३ हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावणी आहे. हे आदेश अति सत्र न्यायाधिश, वडगाव मावळ यांनी दिले आहेत.
लक्ष्मण प्रभु वाघ (रा. गणेश तलाव आकुर्डी मुळ राहणार मु.पो. फुलारवाडी ता.पाथरी जि परभणी) अशी शिक्षा ठोठावण्यात आलेल्या गुन्हेगाराचे नाव आहे. तर शितल विनय ओहोळ (वय-३२, काळेश्वर सोसायटी, सेक्टर नंबर २६, प्लॉट नंबर ए-१ प्राधिकरण निगडी) असे खून झालेल्या महिलेचे नाव आहे. सदर प्रकार हा २६ ऑगस्ट २०११ रोजी घडला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, निगडी येथे अनोळखी चोरट्याने जबरी चोरी करण्याचे उद्देशाने घरामध्ये प्रवेश करून धारदार कोयत्याने शितल ओहोळ यांच्या चेहन्यावर व डोक्यावर ठिकठिकाणी वार करून खुन केला. व घरातील सोन्याचे दागिने व मोबाईल असा २ लाख १४ हजार रुपये किमतीचा मौल्यवान ऐवज जबरी चोरी करुन नेला होता. याप्रकरणी विनय ओहोळ यांनी देहूरोड पोलीस ठाण्यात तक्रार दिली होती.
सदर गुन्ह्याचे गांभीर्य लक्षात घेऊन सहा पोलीस आयुक्त राम जाधव यांनी गुन्हयाचा तपास स्वतः कडे घेतला होते. जाधव यांनी निगडी परिसर पिंजून काढला. मात्र गुन्हेगाराचा सुगावा लागत नव्हता.
तपास करीत असताना, पोलिसांना इसम लक्ष्मण वाघ हा शितल ओहोळ (मृतक ) यांच्या घरासमोर असलेल्या महादेवाच्या मंदिरामध्ये बराच वेळ विनाकाण बसत होता अशी विश्वसनिय माहिती एका खबऱ्यामार्फत मिळाली.
मिळालेल्या माहितीच्या अनुषंगाने पोलिसांनी इसम लक्ष्मण वाघ याचा आकुर्डी, प्राधिकरण परिसरात शोध घेतला असता तो मिळुन आला नाही, म्हणुन पोलिसांना अधिक संशय बळावला. पोलिसांनी तपासाची तातडीने चक्रे हालवून लक्ष्मण वाघ याला परभणी येथून ताब्यात घेतले. आरोपीला ताब्यात घेऊन अधिक चौकशी केली असता, आरोपीने
शितल ओहोळ यांचा खून केल्याची कबुली पोलिसांना दिली होती.
सदर खटल्याची सुनावणी माननीय अति सत्र न्यायाधिश, वडगाव मावळ येथे सुरु होती. या खटल्यात सरकारी वकील पाठक मॅडम यांनी केलेले युक्तिवाद व पुरावे ग्राह्य धरून न्यायालयाने आरोपी लक्ष्मण वाघ याला जन्मठेपसह ५ हजार रुपये दंड, पुरावा नष्ट केल्याप्रकारणी ३ महिने साधा कारावास, जबरी चोरीच्या गुन्हयासाठी ७ वर्षे सक्षम कारावास आणि ३ हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावणी आहे.
दरम्यान, या खटल्यात सरकारी वकील पाठक मॅडम यांना पोलीस निरीक्षक राम जाधव, पोलीस निरीक्षक सोमनाथ जाधव, सहाय्यक फौजदार किरण आरुटे,पोलीस हवालदार दादा जगताप, अल्ताफ हवालदार व बाळु तोंडे यांची मदत मिळाली आहे.