संभाजीनगर : अलिबागच्या काशिद समुद्राकिनारी सहलीसाठी गेलेल्या दोन शाळकरी मुलांचा समुद्रात बुडूण मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली आहे. ही घटना सोमवारी (ता.९) रोजी दुपारी १२ वाजण्याच्या सुमरास घडली आहे.
प्रणव कदम आणि रोहन बेडवाल असे मृत्यू झालेल्या मुलांची नावी आहेत.
मिळालेल्या माहिती नुसार, संभाजीनगरमधील कन्नडच्या सानेगुरुजी विद्यालयातील विद्यार्थी आणि शिक्षक अलिबागच्या काशिद समुद्राकिनारी सहलीसाठी आले होते. त्यावेळी सहा विद्यार्थी समुद्रात उतरले , त्यांच्यासोबत शाळेतील पाच शिक्षकही होते .मात्र अचानक विद्यार्थी खोल समुद्रात गेले आणि लाटेच्या प्रवाहात बुडाले. त्यांनी मदतीसाठी आरडाओरडा करताच शिक्षकांनी धावाधाव केली व त्यातील चौघांना वाचविण्यात यश आले. तर दोन विद्यार्थीचा मृत्यू झाला आहे.
दरम्यान, बुडालेल्या दोघांचेही मृतदेह हाती लागले आहेत. वाचवण्यात आलेल्यांवर अलिबाग जिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहेत. या विद्यार्थ्यांची प्रकृती व्यवस्थित असल्याची माहिती रूग्णालय प्रशासनाने दिली आहे.