राहुलकुमार अवचट
यवत : ‘रक्तदान करुया, मानव सेवा घडवूया’ हे ब्रिदवाक्य ठेवून आम्ही केडगावकर – बोरीपार्धी आयोजित भव्य रक्तदान शिबीराचे आयोजन लालचंदनगर , केडगाव स्टेशन येथे करण्यात आले होते. यावेळी सौ व श्री डॉ. चव्हाण या दाम्पत्यांसह ४ परिवारीतील पती-पत्नी यांनी रक्तदान केले यावेळीमहीलांनी देखील रक्तदान करुन आदर्श निर्माण केला.
यावेळी एकूण ३३१ रक्तदात्यांनी मोठ्या उत्स्फुर्तपणे सहभाग घेवुन रक्तदान केले. याशिबीरासाठी केडगाव व बोरीपार्धी परिसरातील १७ सामाजिक संस्थानी सहकार्य केले.
या कार्यक्रमासाठी पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे अध्यक्ष प्रा.दिगंबर दुर्गाडे, माजी आमदार रमेश थोरात, जैन साध्वी महासती, प.पू. शुभदाजी म.सा., राहुल महारज राऊत ,राष्ट्रवादी कॉग्रेस पक्षाचे दौंड तालुकाध्यक्ष आप्पासाहेब पवार, भिमा पाटस साखर कारखाना माजी संचालक धनजी शेळके, माजी जि प सदस्या राणी शेळके, पंचायत समिती माजी सभापती झुंबर गायकवाड, माजी उपसभापती नितिन दोरगे, दिलीप हंडाळ बोरीपार्धीचे सरपंच सुनिल सोडनवर व युवानेते आभिषेक थोरात, शेखर सोडनवर ,नितिन कुतवळ, मनोज शेळके यांसह विविध सहकारी संस्थाचे पदाधिकारी ग्रामपंचायतीचे आजी- माजी सदस्य तसेच पोलीस बांधव, पत्रकार, डॉ. सचिन भांडवलकर , डॉ. अवचट , डॉ. देशमुख , डॉ. कदम,आदी मान्यवर उपस्थित होते.
याशिबीरासाठी संयोजक म्हनुन नितिन जगताप, डॉ संदिप देशमुख, धनराज मासाळ, निलेश मेमाणे, प्रितम गांधी, गजानन लोणकर, सलमान खान, हर्षद शिकिलकर, आशिष नहाटा, समिर डफेदार, वसिम बेग, तुषार शेळके, आविनाश खुंटे, निलेश कुंभार, आकाश चव्हाण, यांनी मदत केली.
या शिबीरासाठी नवकार डेव्हलपर्स यांनी हॉल उपलब्ध करुन देत विशेष सहकार्य केले. यावेळी संयोजकांनी सर्व रक्तदात्यांना प्रमाणपत्र देऊन सहकार्याबद्दल आभार मानले.