संतोष पारधी
वाकी बुद्रुक(ता.खेड) : स्वराज्य संघ महाराष्ट्र राज्य आयोजित श्री शिवनेरी गड ते श्री पुरंदर गड पालखी सोहळ्याचे चाकण शहरात जल्लोषात स्वागत करण्यात आले. छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती संभाजी महाराज या पिता-पुत्राची भेट छञपती शिवाजी महाराजांच्या अंतिम समयी झाली नव्हती, त्यामुळे या पालखीच्या माध्यमातून छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती संभाजी महाराज यांची भेट घडवून आणली जाते.
शिवचरित्र व शंभूचरित्र कथाकार ह.भ.प. बाजीराव महाराज बांगर यांच्या संकल्पनेतून हा पालखी सोहळा आयोजित करण्यात आला आहे. चाकण येथे पालखीची सवाद्य मिरवणूक जल्लोषात काढण्यात आली.
यावेळी स्वराज्य संघाचे संस्थापक अध्यक्ष ह.भ.प. बाजीराव महाराज बांगर, उपाध्यक्ष बाबासाहेब दिघे, सचिव श्यामकांत निघोट, संपर्क प्रमुख सचिन उढाणे, सदस्य बहिरु निघोट, सहसंपर्क प्रमुख संतोष टाकळकर, आंबेगाव तालुका अध्यक्ष प्रकाश बोऱ्हाडे, शिरूर अध्यक्ष विशाल दिघे, सहसंपर्क प्रमुख शिरूर तालुका विश्वास महाराज गाडगे, सुभाष जैद, किल्लेदार फिरंगोजी नरसाळा स्मारक प्रतिष्ठान चे संस्थापक अध्यक्ष ऍड किरण झिंझुरके, उपाध्यक्ष राहुल वाडेकर, शैलेश कड, रावसाहेब ढेरंगे, दिक्षित सर, रवींद्र शिंदे, दिलीप करपे, सत्यवान तांबे, कैलास साळवे, संतोष लोणारी, विजय ठाकुर, किशोर झिंझुरके, जगन्नाथ गोरे, सुनील वैरागी, शिवाजी परदेशी, नामदेव पानसरे, मुरलीधर मंडलिक, गणेश कड, भगवान मेदनकर, किशोर परदेशी, मनोजशेठ मांजरे, नामदेव भोर, भानुदास डोंगरे व चाकण पंचक्रोशीतील सर्व शिवभक्त यावेळी उपस्थित होते.