लोणी काळभोर, (पुणे) : एका हॉटेलमध्ये चहा पिताना एकमेकांकडे रागाने पहिल्याच्या कारणावरून दोघांनी मिळून एकाला बेदम मारहाण केल्याची घटना कदमवाकवस्ती (ता. हवेली) ग्रामपंचायत हद्दीत घडली.
धीरज कांबळे (वय-२३) व गणेश अनिल पांढरेकर (वय-२१रा. दोघेही, कदमवाकवस्ती, ता. हवेली) अशी दोघांची नावे आहेत. याप्रकरणी लोणी काळभोर पोलीस ठाण्यात शिवम राखुंडे (वय-२३) यांनी तक्रार दिली आहे. त्यानुसार पोलिसांनी दोघांनाही पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, कदमवाकवस्ती ग्रामपंचायत हद्दीतील एका हॉटेलमध्ये धीरज कांबळे, गणेश पांढरेकर व शिवम राखुंडे हे चहा पीत बसले होते. यावेळी धीरज व शिवम यांच्यात नजरेला नजर भिडली. यातून ‘तू काय बघतोस’ यावरून या दोघांमध्ये शाब्दिक बाचाबाची झाली.
दरम्यान, या कारणावरून दोघात वाद झाला. त्यानंतर शिवमने धीरजला फोन करून तुझा काही तरी गैरसमज झाला आहे, असे म्हणत वाद मिटविण्याचा प्रयत्न केला. पण, भांडनावेळी संतापलेल्या धीरजने त्याला भेटण्यासाठी म्हणून बोलावले. शिवम त्याच्या मित्रांसोबत तेथे गेल्यानंतर धीरज व गणेशने त्याला मारहाण केली. याप्रकरणी शिवम राखुंडे याने लोणी काळभोर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली होती. त्यानुसार पोलिसांनी धीरज कांबळे व गणेश पांढरेकर यांना अटक केली आहे. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक अमित गोरे करीत आहेत.