पुणे : दोन चिमुकल्यांचे भरदिवसा अपहरण करण्याचा प्रयत्न करणाऱ्या महिलेला तळेगाव दाभाडे पोलिसांनी गणपती चौक ते घोरवडी स्टेशनकडे जाणाऱ्या रस्त्यावरून बुधवारी (ता.४) सकाळी अकरा वाजण्याच्या सुमारास अटक केली.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी महिलेने एक ५ वर्षीय मुलाला व ३ वर्षीय मुलीला फुस लावून पळवून नेण्याचा प्रयत्न करीत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. मिळालेल्या माहितीच्या अनुषंगाने पोलिसांनी आरोपी महिलेला तळेगाव दाभाडे परिसरातील गणपती चौक ते घोरवडी स्टेशनकडे जाणाऱ्या रस्त्यावरून ताब्यात घेतले आहे.
दरम्यान, याप्रकरणी २३ वर्षीय महिलेने फिर्याद दिली आहे. त्यानुसार एका महिला आरोपीला अटक करण्यात आली आहे. आरोपी महिलेच्या विरोधात भादवि कलम 363, 511 अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास तळेगाव दाभाडे पोलीस करीत आहेत.