पुणे : दरवर्षी शेकडो पोलीस बांधव पुणेकरांच्या सुरक्षेसाठी रस्त्यावर असतात. नवीन वर्षाच्या बंदोबस्तासाठीही ते तैनात असतात. एकीकडे पुण्यातील तरुण मंडळी पार्टी करण्यात व्यस्त होती. तर दुसरीकडे काही तरुण पोलिसांची काळजी घेण्यात व्यस्त दिसले. नवीन वर्षाचा जल्लोष संपल्यानंतर पोलिसांचा थकवा काही प्रमाणात दूर व्हावा, यासाठी पुण्यातील स्पंदन संस्थेच्या तरुणांनी पार्ट्या न करता थर्टी फर्स्टचे ह़टके सेलिब्रेशन केले आहे.
स्पंदन संस्थेच्या तरुणांनी पोलीस बांधवांना चहा-पाणी वाटून नव्या वर्षाची सुरुवात करीत आहेत. तसेच पोलिसांचे आभारदेखील मानतात. तरुणांनी चतुःश्रृंगी पोलिस चौकी , पुणे विद्धापीठ चौक , श्रीमंत दगडूशेठ गणपती मंदीर, अलका टॅाकीज् चौक गुडलक चौक, डेक्कन पोलीस आणि सांगवी पोलिस स्टेशन या ठिकाणी तैनात असलेल्या पोलिसांना चहा-पाण्याचे वाटप केले आहे.
यावेळी युवा स्पंदन संस्थेचे करण सुरवसे, आदित्य राऊत, रितेश ठोबळे, संतोष शिंदे आणि मैत्री युथ फाउंडेशन संस्थेचे सुहासराज महाडीक, आदर्श सोनावने, आर्यन देसले, कृष्णराज ढोरे, रोहन पोटे, कुणाल लाड या तरुणांनी एकत्र येत हा उपक्रम सुरु केला आहे.
दरम्यान, पोलीस बांधवांचे आभार मानण्यासाठी या तरुणांनी हा उपक्रम सुरु केला आहे. तरुणांचा उपक्रम पाहून पोलिसांनीदेखील तरुणांचे कौतुक केले आहे. तसेच पोलिसांनीही स्पंदन संस्थेचे आभार मानले आहे. व तरुणांचे कौतुक केले आहे.