युनूस तांबोळी
शिरूर : शिरूर तालुक्याच्या बेट भागातील दुष्काळाचे चित्र आणि त्याच्या झळा पहाणारा मी एकमेव आमदार असून हा परीसर बागायत करण्यासाठी अनेक संकटाना सामोरे गेलो आहे. शिक्षण, आरोग्य, रस्ते, वीज यावर काम करून या भागात विकासाचा वटवृक्ष उभा केला आहे. हे उभे केलेले नंदनवन असेच फुलविण्यासाठी गावागावातील नागरिकांनी एकत्रीत येऊन पुढाकार घेणे गरजेचे आहे.असे प्रतिपादन माजी आमदार पोपटराव गावडे यांनी व्यक्त केले.
जांबूत (ता. शिरूर ) येथील जय मल्हार हायस्कूल मध्ये स्वर्गवासी लखीमचंद गांधी यांच्या स्मरणार्थ त्यांच्या पत्नी
अरूणा गांधी यांच्या वतीने दिड लाख रूपये किंमतीचे शुद्ध पिण्याच्या पाण्याची यंत्रणा बसविण्यात आली. त्याचे उद्घाटन गावडे यांच्या हस्तेकरण्यात आले.
त्यावेळी ते बोलत होते. यावेळी सरपंच दत्तात्रेय जोरी, कमलेश गांधी,विमलेश गांधी,निलेश गांधी, मुख्याध्यापक सतीष फिरोदिया, माजी मुख्याध्यापक आर. एस. कापसे,पोपट फिरोदिया, पोलिस उपनिरीक्षक बाळासाहेब जोरी, कारभारी थोरात, बाळासाहेब फिरोदिया, सिताराम म्हस्के,गुलाब वाळुंज, डॅा. खंडू फलके, बाळासाहेब पठारे, दिनकर थोरात, संतोष जोरी, किसन राऊत आदि ग्रामस्थ उपस्थीत होते.
विमलेश गांधी म्हणाले की, विद्यार्थ्यांच्या भौतीक सुवीधासाठी अनेक स्तरातून मदत ही होत असते. शैक्षणीक जीवनात तयार केलेल्या या सुविधा जतन करण्याचे काम विद्यार्थ्यांचे आहे. शिक्षण घेऊन विद्यार्थ्यांनी नोकरीपेक्षा व्यवसायीकतेवर भर दिला पाहिजे. त्यावेळी स्पर्धात्मक युगात कुठेतरी स्थैर्य प्राप्त होईल.सुत्रसंचालन माजी पंचायत समिती सदस्य वासुदेव जोरी यांनी केले. सुनिल जाधव यांनी आभार मानले.
अकरावी व बारावीचे वर्ग सुरू करण्यासाठी शाळेने पुढाकार घ्यावा. यावर चांगलाच उहापोह या ठिकाणी झाला असून त्यासाठी लागणारा निधी उभा करण्यासाठी ग्रामस्थ समर्थ असल्याचे सांगितले. त्यावेळी भवीष्यात ही शाळा डीजीटल शाळा करण्यासाठी गांधी कुटूंब व ग्रामस्थ पुढाकार घेणार असल्याचे यावेळी सांगण्यात आले.