भाजप: भारतीय जनता पक्ष (भाजप) 6 एप्रिल रोजी देशभरात भव्य कार्यक्रमांसह 45 वा स्थापना दिवस साजरा करणार आहे. पक्षाने ध्वजारोहण समारंभ, विचारवंतांना श्रद्धांजली आणि सक्रिय सदस्यांसाठी परिषदांसह विविध उपक्रमांची योजना आखली आहे. 14 एप्रिल रोजी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीबरोबरच विशेष कार्यक्रम आणि चर्चासत्रांचे आयोजन केले आहे. पक्षाच्या स्थापनेच्या ४५व्या वर्धापन दिनानिमित्त या वर्षीच्या उत्सवाला विशेष महत्त्व आहे.
6 एप्रिल रोजी देशभरातील भाजप कार्यालये आणि घरांवर ध्वजारोहण केले जाणार आहे. तसेच कार्यालय विशेष सजावटीने सजवले जाणार आहे. तसेच सोशल मीडियावर सेल्फी काढून #bjp4viksitBharat या हॅशटॅगसह पोस्ट करणे बंधनकारक केले आहे.
7 एप्रिलला प्रत्येक बूथ स्तरावर श्यामा प्रसाद मुखर्जी, पंडित दीनदयाल उपाध्याय आणि भारत माता इत्यादी प्रमुख आणि महान व्यक्तिमत्वाचे फोटो लावून दारांजली अर्पण केली जाणार आहे. या निमित्त त्या त्या भागातील प्रमुख मान्यवर कार्यक्रमाला उपस्थित राहणार आहे. 7 ते 12 एप्रिल या कालावधीत ‘बूथ चलो अभियान’ मोहिमेचा एक भाग म्हणून वरिष्ठ कार्यकर्ते वॉर्डांमध्ये भेटी देतील.
पक्षाच्या निवडणूका आणि संघटनात्मक विस्तार, भारतीय राजकारणावर होणारा परिणाम आणि नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली भारताचा विकास यावर लक्ष केंद्रित करणारी परिषद विधानसभा स्तरावर 8-9 एप्रिल रोजी सक्रिय सदस्यांसाठी आयोजित केली जाणार आहे.
डॉ. आंबेडकरांच्या पुतळ्यांची स्वच्छता आणि दीपप्रज्वलन १३ एप्रिलला होणार आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना श्रद्धांजली वाहण्यात येणार आहे. आंबेडकर आणि राज्यघटनेच्या प्रास्ताविकेचे 14 एप्रिल रोजी सामूहिक वाचन करण्यात येणार आहे. – डॉ. आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त 15 ते 25 एप्रिल दरम्यान प्रत्येक जिल्ह्यात परिसंवाद आणि चर्चा सत्र होणार आहेत. देशभरातील विविध कार्यक्रमांमध्ये पक्षाचे कार्यकर्ते आणि नेते सहभागी होऊन भाजपचा 45 वा स्थापना दिन सोहळा उत्साहाने साजरा करणार आहेत.