संभाजीनगर (औरंगाबाद) : राज्यातील राजकीय वातावरण गरम होण्यास सुरुवात झाली असली तरी लोकसभा व विधानसभा या दोन्ही निवडणुका एकत्रच होणार असल्याचा दावा भारतीय जनता पक्षाचे नेते तथा केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांनी केला आहे. त्यांच्या दाव्यानंतर राजकीय वर्तुळात एकाच खळबळ उडाली आहे.
संभाजीनगर जिल्ह्यातील फुलंब्री तालुक्यातील भाजपाच्या नवनिर्वाचित सरपंच व ग्रामपंचायत सदस्यांचा सत्कार समारंभ आयोजित करण्यात आला होता. यावेळी खासदार रावसाहेब दानवे बोलत होते.
राज्यातील राजकीय सद्यस्थिती पहाता, लोकसभेबरोबरच विधानसभेच्या निवडणुका देखील होऊ शकतात. त्यामुळे या परिस्थितीतून जिल्ह्यातील इतर पक्षातील नेते देखील भारतीय जनात पक्षात प्रवेश करण्याची शक्यता आहे, असा दावा देखील दानवे यांनी बोलताना केला.
राज्यात मध्यावधी निवडणुकांची राळ विरोधक उठवत असताना दानवे यांनी केलेल्या दाव्याने राजकीय राजकीय पंडित देखील चक्रावून गेले आहेत.
फुलंब्री येथे आयोजित कार्यक्रमात रावसाहेब दानवे यांनी जोरदार फडकेबाजी केली. त्याबरोबरीने गावातील राजकारण यावर नूतन सरपंच तथा ग्रामपंचायत सदस्य यांना मोलाचे अनेक सल्ले देखील देताना दानवे यांनी आपला राजकीय प्रवास उलघडून दाखविला.