पुणे : चांगली नोकरी मिळवण्यासाठी अनेकांकडून प्रयत्न केले जातात. त्यात विविध परीक्षा, मुलाखती दिल्या जातात. पण तरीही काहीवेळा नोकरी मिळण्याची ही संधी हुकतेच. मात्र, अजूनही तुम्ही चांगल्या नोकरीसाठी इच्छुक असाल तर तुमच्यासाठी ही महत्त्वाची बातमी असणार आहे. कारण, कर्मचारी राज्य विमा महामंडळ येथे आता नोकरी मिळू शकणार आहे. त्यासाठी अर्ज मागवण्यात येत आहेत.
जर तुमच्याकडेही आवश्यक पात्रता असेल तर ही तुमच्यासाठी सुवर्णसंधीच असणार आहे. कर्मचारी राज्य विमा महामंडळ येथे ज्येष्ठ निवासी, पूर्णवेळ विशेषज्ञ, आयुर्वेद चिकित्सक, होमिओपॅथी चिकित्सक आणि अर्धवेळ / पूर्णवेळ सुपर स्पेशालिस्ट या पदांसाठी भरती प्रक्रिया सुरु होत आहे. यासाठी मुलाखत घेतली जाणार आहे. यामध्ये निवड झालेल्या उमेदवाराला मुंबई येथे जाऊन नोकरी करावी लागणार आहे. यामध्ये 29 रिक्त पदे भरली जाणार आहेत. संबंधित उमेदवाराची निवड ही मुलाखतीच्या माध्यमातून केली जाणार आहे.
या भरती प्रक्रियेंतर्गत निवड झालेल्या उमेदवाराला दोन लाखांपर्यंत पगारही मिळणार आहे. या भरती प्रक्रियेबाबत अधिक माहितीसाठी https://www.esic.nic.in/ या अधिकृत वेबसाईटवरून माहिती घेता येणार आहे.
अशी असेल भरती प्रक्रिया…
– पदाचे नाव : ज्येष्ठ निवासी, पूर्णवेळ विशेषज्ञ, आयुर्वेद चिकित्सक, होमिओपॅथी चिकित्सक आणि अर्धवेळ / पूर्णवेळ सुपर स्पेशालिस्ट.
– एकूण रिक्त पदे : 29 पदे.
– नोकरीचे ठिकाण : मुंबई.
– शैक्षणिक पात्रता : बीएचएमएस, बीएएमएस, एमडी/एमएस, पीजी डिग्री / डीएनबी / डिप्लोमासह एमबीबीएस.
– वेतन / मानधन : दरमहा 50000 ते 200000 रुपयांपर्यंत.
– निवड प्रक्रिया : मुलाखत.
– मुलाखतीची तारीख : 2, 3 आणि 4 एप्रिल 2025.
– मुलाखतीचा पत्ता : प्रशासकीय ब्लॉक, 5वा मजला, ESIS हॉस्पिटलचा परिसर, कांदिवली, आक्रूली रोड, कांदिवली पूर्व, मुंबई – 400101.