अजित जगताप
वडूज : सातारा जिल्हा प्राथमिक शिक्षक बँकेच्या निवडणूकीत सभासद परिवर्तन पॅनेलने वचन नामा दिला होता. तो वचननामा राबविण्यासाठी सध्याचे संचालक मंडळ सक्षम आहे असा आत्मविश्वास पॅनेलचे प्रणेते व बँकेचे माजी अध्यक्ष बलवंत पाटील यांनी दिली.
खटाव तालुक्यातील शिक्षक वर्गाच्या वतीने वडूज ता खटाव येथे आयोजित केलेल्या सन्मान सोहळा कार्यक्रमात श्री पाटील बोलत होते. यावेळी बँकेचे मार्गदर्शक नेते विश्वभर रणनवरे, सुनिल सावंत,नुतन अध्यक्ष नवनाथ जाधव, संचालक शहाजी जाधव, शहाजी काळे, खरात, कदम,अजित कंठे, दिपक गिरी आदि मान्यवर उपस्थित होते.
शिक्षक बँकेच्या निवडणूकीत सतरा नेतेगण मंडळींचे बॉण्ड झाले होते.अध्यक्ष-उपाध्यक्ष निवडीच्या वेळी सर्वांनी नवनाथ जाधव व शशिकांत सोनवलकर यांच्या नावाची शिफारस केली होती. आता संचालक मंडळ सक्षम असून चांगले काम करीत आहेत.अशी शाबासकी श्री पाटील यांनी दिली.
उपाध्यक्ष, माजी अध्यक्ष-उपाध्यक्ष दोघांना जोडीला घेऊन सभासद हिताचा कारभार सुरू आहे. मान्यवर नेते मंडळी तात्या साहेब साळुंखे, बलवंत पाटील व उदय शिंदे यांनी जबाबदारी सोपवली आहे, त्या विश्वासाला तडा जाऊ देणार नाही, सर्व विभागाची बैठक घेऊन आढावा घेत आहे, नक्कीच व्याजदर कमी केला जाईल. बँकेचे धोरण निश्चित आखले जाईल.असे अध्यक्ष नवनाथ जाधव म्हणाले.
यावेळी मार्गदर्शन करताना जेष्ठ शिक्षक नेते सुनिल सावंत, रणनवरे, जाधव यांनी मनोगत व्यक्त करताना सांगितले की, वचननामा शंभर टक्के राबवा, कर्ज काढून दिले तर बँक ज्यादा नफा मिळवा,३५ हजार रुपयांमध्ये झाले, आता दहा ते पस्तीस लाख रुपयांचा खर्च आपल्याच माणसासाठी झाला. बँके सॊबत संघटनेकडे लक्ष केंद्रित केले पाहिजे.
निवडणूक ठराविक कालावधी साठी असते. विश्वास दाखविला, सभासदांच्या हितासाठी तसेच चेअरमन जाधव सॊबत असल्याने राजकारणाला फाटा देऊन सहकार्य करणार आहे. वयाने लहान असून आदर्शवत काम करणार आहेत.असे संचालक शहाजी जाधव म्हणाले.
शिक्षक बँकेच्या वडूज शाखेच्या वतीने झालेल्या या कार्यक्रमला सूर्यकांत कदम, विजय गोरे, विजय गुरव, धनाजी कुऱ्हाडे,नितीन माने, सागर माने,आदी शिक्षक, सेवानिवृत्त शिक्षक सभासद उपस्थित होते.यावेळी जय हिंद, जय सभासद परिवर्तन पॅनल च्या घोषणेने सभागृहात अस्तित्व दाखविण्यात आले
दरम्यान,तीस पस्तीस वर्षांच्या काळात ऐतिहासिक निवडणूक झाली, नेत्यांनी ठरविलेल्या आघाडीला सभासदांनी यश मिळवून दिले आहे. सांपत्तिक स्थिती विचार करण्यास लावणारी आहे. बँक सावरण्यासाठी निश्चित पणाने प्रयत्न केले जातील, साडेनऊ हजार सभासद आहेत, दोन वर्षात हजार सभासद सेवानिवृत्त होतील.याची ही आठवण करून देण्यात आली खटाव तालुक्यातील मोळ हेशक्ती स्थळ झाले,शिक्षक बँक अध्यक्ष व समितीचे जिल्हाध्यक्ष पद देऊन खटाव तालुक्याचा सन्मान राखल्याबद्दल शिक्षक नेते बलवंत पाटील यांचा सत्कार करण्यात आला.
बारा कोटी रुपयांचा फायदा झाला तर बँक फायद्यात येणार आहे. याची यानिमित्त शिक्षक बँक नेत्यांनी शिक्षक सभासदांच्या मनोगताबाबत माहिती दिली. रासकर यांनी सूत्रसंचालन केले. दिपक गिरी यांनी आभार मानले.