मुंबई : भावनगर येथील उमराळा पोलिसांनी मला अटक केली होती, अटक केल्यानंतर चौकशी केल्यानंतर सोडून दिले अशी माहिती गुजरात आम आदमी पार्टीचे प्रदेशाध्यक्ष गोपाल इटालिया यांनी स्वतः ट्विट करून दिली.
ऑक्टोबर महिन्यात देखील गुजरात पोलिसांनी इटालिया यांना ताब्यात घेऊन सुमारे तीन तास चौकशी केली होती. पोलिसांनी सोडल्यानंतर त्यांनी भारतीय जनता पक्ष, दिल्ली पोलीस व राष्ट्रीय महिला आयोगाच्या अध्यक्षा रेखा शर्मा यांच्यावर गंबीर आरोप केले होते.
तसेच गुजरात निवडणुकीपूर्वी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर आक्षेपार्ह टिपणी करणारा इटालिया यांचा एक व्हिडीओ व्हायरल झाला होता. त्याबरोबरीने गुजरात भाजपाने देखील इटालिया महिलांना मंदिरात जाऊ नका असा सल्ला देणारा व्हिडीओ शेयर केला होता. याच व्हिडीओची दाखल घेताना राष्ट्रीय महिला आयोगाने समन्स बजावताना इटालियन यांना चौकशीसाठी बोलावले होते.
यावेळी गुजरातमधील आम आदमी पक्षाचे प्रदेशाध्यक्ष गोपाल इटालिया यांनी आपल्या अटकेची माहिती देण्यासोबतच भाजपवरही (BJP) निशाणा साधला. ”विधानसभा निवडणुकीत गुजरातच्या जनतेने भाजपवर विश्वास व्यक्त करून पूर्ण बहुमत दिले होते. आता नवीन सरकारने आपले काम सुरू केले आहे.
पण भावनगर पोलिसांनी आज मला अटक केली. माझ्या आजीचे काल निधन झाले. संपूर्ण कुटुंब दुःखी आहे, पण मला अटक करण्यात आली आहे. कदाचित या कामासाठी बहुमत मिळाले असेल.”असे ट्विट करत त्यांनी भाजपवर निशाणा साधण्याच्या प्रयत्न केला आहे.