उरुळी कांचन : डाळिंब बन (ता. दौंड) ग्रामपंचायतीच्या सरपंचपदी काँग्रेसचे सामान्य निष्ठावान कार्यकर्ते बजरंग म्हस्के यांची जनतेतून थेट निवडून आले आहेत. या निवडणुकीत त्यांनी प्रतिस्पर्ध्यांना धूळ चारुन सरपंचपदी विराजमान झाले आहे.
श्रीक्षेत्र विठ्ठलबन (ता. दौंड) येथील सरपंच पदाची सार्वत्रिक निवडणुकीत ही श्री विठ्ठल ग्रामविकास पॅनेल, श्री विठ्ठल जनसेवा पॅनेल, श्री काळ भैरवनाथ पॅनेल व अपक्ष यांमध्ये चुरशीची आणि रंगतदार चौरंगी लढत झाली होती. या निवडणुकीत श्री विठ्ठल ग्रामविकास पॅनेलने ४, श्री काळ भैरवनाथ पॅनेलने ३ आणि श्री विठ्ठल जनसेवा पॅनेलने २ जागा जिंकल्या आहेत.
दरम्यान, बजरंग म्हस्के यांना कुल व थोरात या पारंपारीक गटाची अनपेक्षित छुपी मते मिळून आश्चर्यकारकारक रीत्या तब्बल ४३३ मतांनी विरोधकांना धुळ चारली आहे.यामुळे सर्वांनाच आश्चर्याचा धक्का बसला आहे.
विजयी उमेदवारांची नावे पुढीलप्रमाणे (कंसात पॅनेलचे नाव)
सरपंचपदी – बजरंग सुदाम म्हस्के (श्री विठ्ठल ग्रामविकास पॅनेल)
१) सर्जेराव दत्तात्रय म्हस्के (श्री विठ्ठल ग्रामविकास पॅनेल)
२) उषा दीपक म्हस्के (श्री विठ्ठल ग्रामविकास पॅनेल)
३) सीमा रामदास सुतार (श्री विठ्ठल ग्रामविकास पॅनेल)
४) स्वप्नील संभाजी जरांडे (श्री विठ्ठल ग्रामविकास पॅनेल)
५) रवींद्र भाऊसाहेब म्हस्के ( श्री काळ भैरवनाथ पॅनेल)
६) लक्ष्मी भाऊसाहेब कांबळे (श्री काळ भैरवनाथ पॅनेल)
७) बबई नामदेव म्हस्के (श्री काळ भैरवनाथ पॅनेल)
८) सागर रामदास म्हस्के (श्री विठ्ठल जनसेवा पॅनेल)
९) नीलम सुनील म्हस्के (श्री विठ्ठल जनसेवा पॅनेल)