लोणी काळभोर, (पुणे) : मास्टर्स गेम्स असोशियन महाराष्ट्र राज्य आयोजित राज्यस्तरीय मैदानी स्पर्धेत लोणी काळभोर (ता. हवेली) एंजल हायस्कूल व ज्युनिअर कॉलेजचे क्रीडा विभागाचे प्रमुख क्रीडा शिक्षक भाऊसाहेब यशवंत महाडिक यांनी तीन पदके मिळविली आहेत. तसेच ११ व १४ फेब्रुवारी २०२३ रोजी उत्तर प्रदेश मधील वाराणसी येथे राष्ट्रीय स्तरावरील स्पर्धेत त्यांची निवड करण्यात आली आहे.
मास्टर्स गेम्स असोशियन आयोजित राज्य राज्यस्तरीय स्पर्धा डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ संभाजीनगर (औरंगाबाद ) येथील १६ ते १८ डिसेंबर दरम्यान १० प्रकारच्या क्रीडास्पर्धा संपन्न झाल्या.
यास्पर्धेत भाऊसाहेब यशवंत महाडिक यांनी “बांबू उडी” प्रकारात द्वितीय क्रमांक,”पाच हजार मीटर चालणे” या प्रकारात तृतीय क्रमांक, “तिहेरी उडी” प्रकारात तृतीय क्रमांक अशी तीन पदके पटकविले तर फेब्रुवारी २०२३ मध्ये होणाऱ्या राष्ट्रीय स्तरावरील स्पर्धेत त्यांची निवड झाली आहे.
महाराष्ट्र राज्यातून हजारो स्पर्धक या स्पर्धेत सहभागी झाले होते. यशस्वी खेळाडूचे अभिनंदन मास्टर्स गेम्स असोसिएशनचे महाराष्ट्र राज्याचे सचिव बाळा चव्हाण, मास्टर्स गे्म्स असोसिएशनचे राज्याचे सहसचिव व राष्ट्रीय खेळाडू धनंजय मदने, महाराष्ट्र गेम्स असोसिएशन पुणे जिल्ह्याचे सचिव व आंतरराष्ट्रीय खेळाडू महेद्र बाजारे, एअर फोर्स ठाणे विभागाचे संतोष पवार, नगर जिल्हा पोलीस दलातील पोलीस हवालदार अन्सर अली सय्यद, आयकर विभागाचे माजी अधिकारी व आंतरराष्ट्रीय खेळाडू सुजित बडदे यांनी भाऊसाहेब महाडिक यांचे विशेष अभिनंदन केले.