लहू चव्हाण
पाचगणी : पाचगणी येथील सेंट झेविअर्स हायस्कूलच्या विदयार्थ्यांनी तालुका स्तरीय मैदानी स्पर्धेत दमदार खेळाचे प्रदर्शन करताना वर्चस्व राखले.
सातारा जिल्हा क्रिडा कार्यालयामार्फत घेण्यात आलेल्या क्रीडा स्पर्धा विविध तालुक्यांत पार पडल्या. यामध्ये महाबळेश्वर तालुका स्तरावर पांचगणी व महाबळेश्वर येथील जवळपास सर्वच शाळांनी विविध वयोगटानुसार धावणे, फेकणे व उडी मारने या स्पर्धात सहभाग घेतला होता.
यामध्ये सेंट झेविअर्स हायस्कूलच्या विदयार्थ्यांनी विविध वयोगटांच्या स्पर्धांत सहभाग घेतला होता. तसेच यापुर्वी झालेल्या फुटबाॅल व व्हॉलीबॉल स्पर्धेतही या शाळेने विजेतेपद पटकावले होते ‘सेंट झेविअर्स हायस्कूलच्या विद्यार्थ्यांनी विजयाचा क्रम कायम ठेवत विविध स्पर्धेत उत्कृष्ट खेळी केली. प्रथम तीन क्रमांकांमध्ये आपले नाव नोंदवत १९ सुवर्ण २२ रौप्य व ५ कांस्य अशी एकूण ४६ पदके मिळवत घवघवीत यश संपादन केले.
क्रिडा स्पर्धातील यशस्वी स्पर्धकांची नावे खालील प्रमाणे :
वयोगट (१४ वर्षाखालील मुले व मुली )
एडवीन जॉन,प्रथम क्रमांक १०० व २०० मी. धावणे, लांब उडी
रनवीर देशमुख,प्रथम क्रमांक थाळी फेक
समर्थ भोईटे, प्रथम क्रमांक गोळा फेक
सर्वेश जाधव,द्वितीय क्रमांक १०० मी. धावणे
शाहीद खान, द्वितीय कमांक ४०० मी.धावणे.
पूर्वा कैमल, द्वितीय क्रमांक गोळा फेक.
किस टॉम, तृतीय क्रमांक गोळा फेक.
वयोगट (१७ वर्षाखालील मुले व मुली )
अभिनव कुरूप,प्रथम क्रमांक २०० मी. धावणे, द्वितीय क्रमांक ४००मी.धावणे.
अदित्य वाघोले, प्रथम क्रमांक उंच उडी, तृतीय क्रमांक लांब उडी.
मेहेक देसाई, प्रथम क्रमांक तिहेरी उडी.
किरण होलकर, द्वितीय क्रमांक तिहेरी उडी.
कोयना पचारकर, द्वितीय क्रमांक ३००० मी.धावणे, द्वितीय क्रमांक थाळी फेक.
राबिया बिलाखिया, तृतीय क्रमांक ३०००मी.धावणे, द्वितीय क्रमांक तिहेरी उडी.
वसुंधरा जाधव, तृतीय क्रमांक गोळा फेंक
वयोगट १९ वर्षाखालील मुले व मुली
सानिया गिदी, प्रथम क्रमांक भाला फेक, द्वितीय क्रमांक थाळी फेक.द्वितीय क्रमांक १०० मी धावणे.
जोआन जोजन,द्वितीय क्रमांक २०० मी. धावणे,द्वितीय क्रमांक ३००० मी. चालणे.
अंतेसा जोमोन,द्वितीय क्रमांक २०० मी. धावणे, द्वितीय क्रमांक लांब उडी, प्रथम क्रमांक ३००० मी धावणे.
करिश्मा राममंडल, द्वितीय क्रमांक ३००० मी धावणे, तृतीय क्रमांक २०० मी धावणे.
लॉरेटा परेरा, द्वितीय क्रमांक भाला फेक.
दर्शन पांडव,प्रथम क्रमांक ४०० मी. धावणे.८०० मी. धावणे,द्वितीय क्रमांक १५०० मी. धावणे.
अब्दुल तेली, प्रथम क्रमांक २०० मी धावणे, द्वितीय क्रमांक लांब उडी.
ॲग्नव डेवीस, द्वितीय क्रमांक २००,४०० व ८०० मी धावणे.
मोहित धडूक, प्रथम क्रमांक भाला फेक
आर्यन मालूसरे, प्रथम क्रमांक १०० मी धावणे.
ध्रीती डावडा, द्वितीय क्रमांक ८०० मी धावणे.