राहुलकुमार अवचट
यवत : ग्रामपंचायत निवडणुकांची रणधुमाळी काल (दि. १८) रोजी संपन्न झाली. पुणे जिल्ह्यातील दौंड तालुक्यात या निवडणुकांसाठी मोठ्या प्रमाणात मतदान करताना येथील मतदारांनी मतदानाचा उत्साह मोठ्या प्रमाणात दाखविला. यामुळेच तब्बल ८० टक्क्यांनापेक्षा जास्त मतदान दौंड तालुक्यात झाले.
काल झालेल्या निवडणुकीत दौंड तालुक्यात तब्बल ८३.६३ टक्के मतदान झाले. आठ ग्रामपंचायतीच्या निवडणूका काल संपन्न झाल्या. दौंड तालुक्यात देवकारवाडी येथे सर्वाधिक ८९ टक्के मतदान झाले. तर सर्वात कमी दापोडी येथे ७९टक्के मतदान झाले.
दौंड तालुक्यातील दापोडी, लोणारवाडी, नांदूर, डाळींबमी बोरीबडक, देवकरवाडी, दहिटणे, पाटेठाण या ठिकाणी मतदान झाले. नागरिकांनी मतदानासाठी मोठ्या प्रमाणात उपस्थिती दर्शविली.
दापोडीमध्ये ७९ टक्के, लोणारवाडीमद्ये ८५ टक्के, नांदूरमध्ये ८६ टक्के, डाळिंबमध्ये ८१ टक्के, बोरीबडकमध्ये ८३ टक्के, देवकरवाडीमध्ये ८९ टक्के, दहिटणेमध्ये ८२ टक्के तर पाटेठाणमध्ये ८६ टक्के मतदानांची नोंद करण्यात आली.
या आठ ग्रामपंचायतमध्ये एकूण १५५०४ मतदारांपैकी १२२६६ मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला. काल झालेल्या निवडणुकीदवारे सर्वच उमेदवारांचे भविष्य मतपेटीत बंद झाले असून मंगळवारी तहसील कार्यालयात मतमोजणी होणार आहे.