हडपसर : चारचाकी वाहनांचे सायलेन्सर चोरी करून त्यातील धातूमिश्रित माती विक्री करण्याऱ्या टोळीला गुन्हे शाखा युनिट – ५ च्या पोलिसांनी ५ जणांना ताब्यात घेतले असून यात दोन विधीसंघार्षित बालकांचा समावेश आहे.
विनय ललीत चव्हाण, वय २० वर्षे, रा. गजानन मंदिराजवळ, गजानन हाईटस, फुरसुंगी, व दोन विधीसंघार्षित बालक अशी चारचाकी वाहनांचे सायलेन्सर चोरी करणाऱ्या आरोपींची नावे आहेत तर खरेदी विक्री करणारा (तलहा आयुबअली मलीक (वय – २४, रा. सागर कामठेनगर, कोंढवा), व शौकीन इतजार सलमानी (वय – ४५, रा. कुदळवाडी, चिखली) असे भंगार खरेदी विक्री करणाऱ्या आरोपींची नावे आहेत.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पुणे शहर पोलीस ठाण्याच्या हद्दीत कॅरी टेम्पो व मारुती ईको गाडी या चारचाकी गाडीचे सायलेन्सर चोरी होण्याच्या घटनेत वाढ झाली होती. त्या अनुषंगाने युनिट -०५ गुन्हे शाखेचे अधिकारी व अंमलदार हे सायलेन्सर चोरीतील आरोपीचा शोध घेत होते. तपास करणाऱ्या एका पोलीस अंमलदाराना एका खबऱ्याकडून माहिती मिळाली कि, सदरची चोऱ्या या विनय चव्हाण व आणखी दोघेजण करीत आहेत.
त्यानुसार पोलिसांनी विनय व त्याच्या दोन साथीदारांना पोलिसानी ताब्यात घेतले. त्यांच्याकडे अधिक चौकशी केली असता त्यांनी १० सायलेन्सर चोरीचे गुन्हे केल्याची कबुली दिली आहे. तसेच सदरचा चोरलेला मुद्देमाल हा शौकीन सलमानी व तलहा मलिक यांच्याकडे विकल्याची कबुली दिली. पोलिसांनी वरील सर्वांना ताब्यात घेतले आहे.
सदरची कामगिरी गुन्हे शाखा युनिट – ५ चे पोलीस निरीक्षक हेमंत पाटील, सहायक पोलीस निरीक्षक, कृष्णा बाबर, पोलीस उप निरीक्षक, अविनाश लोहोटे, पोलीस अंमलदार प्रताप गायकवाड, प्रमोद टिळेकर, रमेश साबळे, विनोद शिवले, अकबर शेख, शशिकांत नाळे, संजयकुमार दळवी यांनी केलेली आहे.